मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनि ग्रह अडीच वर्षानंतर राशी बदल करतात. या राशी बदलामुळे काही राशींना शनि साडेसाती आणि अडीचकी सुरु होते. तर काहींची शनिच्या प्रभावातून सुटका होते. शनिदेवांनी 29 एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मात्र आता शनि देव वक्री झाले असून 12 जुलैला राशी बदल करत मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे दोन राशींवर अडीचकी सुरु होईल. तर दोन राशींची शनि अडीचकीपासून सुटका होईल.
शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश करताच धनु, मिथुन आणि तूळ रास शनिच्या प्रभाखाली येणार आहेत. तर मीन, कर्क आणि वृश्चिक राशीला तात्पुरता दिलासा मिळणार आहे. 12 जुलै रोजी शनि मकर राशीत प्रवेश करणार असून 17 जानेवारीपर्यंत या राशीत राहणार आहे. या कालावधीत मिथुन आणि तूळ राशीवर शनिचा प्रभाव असेल. जवळपास 7 महिने मिथुन आणि तूळ राशीवर शनिची अडीचकी असेल. 17 जानेवारीला शनि ग्रह पुन्हा एका कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर मीन राशीला साडेसाती आणि कर्क, वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होईल. कर्क आणि वृश्चिक राशीवर 29 मार्च 2025 पर्यंत शनि अडीचकीचा प्रभाव असेल.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2022 हे वर्ष खूप खास आहे. या वर्षात शनिच्या स्थितीत बदल होत आहेत. अडीच वर्षांत राशी बदलणाऱ्या या ग्रहाने यावर्षी 29 एप्रिलला राशी बदलली. 30 वर्षांनंतर शनिने स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश केला. यानंतर 5 जून रोजी शनि वक्री झाला असून आता 12 जुलै रोजी तो पुन्हा कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे.
शनि अडीचकी दरम्यान 'हे' उपाय करा
शनिची अडीचकीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या दरम्यान शनिच्या प्रभावाखाली असलेल्या राशींना साडेसाती किंवा अडीचकीचा त्रास होतो. अशा स्थितीत शनिदेवांची दृष्टी सौम्य करण्यासाठी चांगले कर्म करा. गरिबांना मदत करा. बेघर प्राण्यांना अन्न आणि पाणी द्या. शनिवारी शनि मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )