Sun And Jupiter Conjunction : ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्याचा काही राशींवर चांगला परिणाम होतो. 2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश (Surya Gochar) करणार आहे. तर सुर्याचा मित्र मानला जाणारा गुरु बृहस्पती सध्या मेष राशीमध्येच उपस्थित आहे. त्यामुळे आता 12 वर्षांनंतर दोन मित्रांची भेट (Surya - Guru Yuti) होणार आहे. सूर्य व गुरुच्या मिलनामुळे कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार पाहुया...
कोणच्या राशींना होणार फायदा?
मेष राशी (Aries Zodiac)
सूर्य आणि गुरूचा संयोग मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास तसेच आर्थिक व्यक्तिमत्व देखील सुधारेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. त्याचबरोबर नवीन लोकांशी तुमची ओळख वाढेल आणि तुमचे सामाजिक प्रतिमा देखील उंचवण्यास मदत होईल. तुम्हाला तुमच्या मित्रांचा सहवास मिळेल अन् नव्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.
कर्क राशी (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांचं करिअर आणि व्यवसाय सूर्य आणि गुरूची जोडीमुळे चमकू शकतं. बेरोजगारातून तुम्ही बाहेर निघू शकता. त्याचबरोबर परदेशी जाण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. अडकलेले पैसे देखील वसूल करण्याची कल्पना तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वडिलांचं सहकार्य देखील मिळेल. करिअरमध्ये प्रगती ही तुम्हाला वेगळ्या वळणावर नेऊ शकते.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशींच्या लोकांसाठी येणारा काळ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. गुरु आणि सूर्याच्या संयोगाच्या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच, तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन देखील खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)