आजचे राशीभविष्य | गुरूवार | ११ एप्रिल २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस    

Updated: Apr 11, 2019, 09:07 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरूवार | ११ एप्रिल २०१९ title=

मेष - व्यापाऱ्यांसाठी दिवस चांगला नाही, कोणलाही उधारीवर पैसे देऊ नका. जुन्या उधारीमुळे तणाव राहील. नोकरदार वर्गाने सांभाळून राहा. ऑफिसमध्ये समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबाबत चिंता वाटेल. वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहील. जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीमुळे मूड खराब होईल. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. 

वृषभ - विचार केलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतील. मुलांकडून मदत मिळेल. तुमच्या योजना मेहनतीने पूर्ण कराल, त्यात यश मिळेल. मित्र-भावंडांकडून मदत मिळेल.

मिथुन - व्यावसायात धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चागलं आणि गोड बोलून काम पूर्ण करून घ्याल. तब्येतीमुळे तणाव वाढेल. तब्येतीची काळजी घ्या. जेवताना काळजी घ्या.

कर्क - कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनासारखे नसल्याने मूड खराब होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधातील समस्यांमुळे कोणताही निर्णय घेता येणार नाही. दररोजच्या कामातील समस्या वाढतील. ज्या कामांची आखणी केली आहे ती कामंदेखील पूर्ण होण्यात अडचणी येतील. वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कोणावरही अवलंबून राहू नका. तब्येतीत चढ-उतार राहील.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. लोकांना प्रभावित करू शकाल. तुमच्या विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. तुमच्या सल्ल्यामुळे लोकांना फायदा होऊ शकतो. चागंली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. जोडीदार तुमच्या भावना समजू शकेल. 

कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. मानसिकस्थिती चांगली राहिल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामं पूर्ण होतील. करियर आणि गुंतवणूकीसाठी चागंल्या संधी उपलब्ध होतील. तब्येतीत सुधारणा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तब्येतीच्या तक्रारीत आराम मिळेल.

तुळ - मेहनतीने यश मिळेल. तुमच्या ईच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी घालवू नका. कोणतेही काम हाती घेतल्यास त्यात आवश्यक ती सर्व मदत मिळेल. लोकांकडून कामं करून घेण्यात यशस्वी व्हाल. दिवस चांगला जाईल. तब्येत ठीक राहील. 

वृश्चिक - पैशांच्या बाबतीत नुकसान होऊ शकते. कायदेविषयक कामात अडकू शकता. वेळेकडे लक्ष द्या. काही खास कामांमध्ये जास्त मेहनत करावी लागू शकते. अचानक घडलेल्या घटनेवर लगेच निर्णय घेऊ नका. तब्येत ठीक राहील. थकवा वाटेल.

धनु - शेअर बाजारात विचार करून गुंतवणूक करा. बॉससोबत सावधगिरी बाळगा. तुमच्या करियरसाठी महत्त्वाची असणारी व्यक्ती त्रासदायक ठरू शकते. तुमची मतं मांडण्याची संधी लवकर उपलब्ध होणार नाही. एखादं खास काम पूर्ण होणे अपेक्षित असल्यास परंतु ते पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नका. शांततेने दिवसभर काम करा.

मकर - नुकसान होऊ शकते. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक स्थितीबाबत वाद होऊ शकतो. अधिक जबाबदारी मिळेल. पैशांच्या बाबतीत सावध राहावे लागेल. तणावात राहाल. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते. जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. नवीन लोकांशी ओळखी होतील. व्यवसायात काही नवं करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. तब्येतीच्या बाबतील सांभाळून राहा.

मीन - करियरबाबत निर्णय घेताना सावध राहा. विचार करून गुंतवणूक करा. एखादं महत्त्वाचं काम विसरण्याची शक्यता आहे. कामात गैरसमज होऊ शकतात. दुसऱ्यांचे कामही तुम्हाला करावे लागू शकते. प्रेमसंबंधांत चढ-उतार राहील. तब्येतीकडे लक्ष द्या, लहान-मोठ्या समस्या डोकं वर काढू शकतात.