राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगा

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Apr 8, 2020, 07:32 AM IST
राशीभविष्य  : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगा title=

मेष - आज एखादी शुभवार्ता मिळेल. पुढे जाण्यासाठी चांगली संधी आहे. प्रेमाच्या नात्यात जोडीदाराची साथ लाभेल. आजच्या दिवशी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. फायदेशीर प्रवासयोग संभवतील. 

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी सांभाळून काम करा. आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्या. आज होणाऱ्या खर्चांमुळे तुम्हाला फार फायदा होणार नाही. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करु नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा. 

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप जास्त असेल. जास्त मेहनतही करावी लागू शकते. दिवस जास्तीत जास्त कामांमध्ये व्यतीत होईल. सावध राहा. 

कर्क- व्यावसायिक दृष्टीकोन ठेवा. नवं काम मिळेल. मेहनतीचं फळ मिळेल. नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. 

सिंह- नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांची मदत करा. धनलाभ होईल. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. दिवसही चांगला असेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 

कन्या- कामाच्या ठिकाणी काहीसे चढउतार जाणवतील. आर्थिक व्यवहारांमध्ये अनपेक्षित नुकसान होईल. त्यामुळे या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. दैनंदिन कामांमध्ये अडचणी येतील. 

तुळ- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत तुम्ही एखादं चांगला निर्णय घ्याल. ज्या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत आहात ती उत्तरं आज तुम्हाला मिळतील. 

वृश्चिक - कामाकाजात फायदा होणार आहे. दीर्घकाळासाठी चालणारी एखादी योजना आखाल. येत्या दिवसांमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. 

धनु- व्यवसायामध्ये सावधगिरीने काम करा. कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे नोकरदार वर्गात जास्त तणाव असेल. कोणत्याही कामासाठी संकोचलेपणा नको. 

मकर- कामाच्या बाबतीत तणाव वाढेल. कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत तणाव घेऊ नका. आव्हानं स्वीकारा. अतिउत्साहात कोणतंही चुकीचं काम करु नका. 

कुंभ- अडकलेली कामं पूर्ण होतील. स्वत:वर विश्वास ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. प्रेमसंबंध आणखी दृढ करण्याता प्रयत्न करा. यश मिळेल. 

मीन- कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. योजनाबद्ध पद्धतीने कामं करा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत होणार आहे.