मेष - कामासाठी मेहनत घ्यावी लागेल. जे मनात असेल त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. दिवस शांततेत जाईल. वेळ मिळाल्यास आराम करा.
वृषभ - उत्साही राहाल. कामाच्या ठिकाणी वाटणारा त्रास कमी होईल. सतत नवीन कल्पना मनात येतील. सहकार्यांसह तुमचे विचार शेअर करु शकता.
मिथुन - आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांच्या बाबतीत अनेक दिवसांपासून असणारी चिंता कमी होईल. नवीन नोकरीसाठी दिवस चांगला आहे. पुढील योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.
कर्क - तुमच्या विचारांचा सन्मान होईल. घरात, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. तुमचे विचार मांडतांना स्पष्टपणे मांडा. तब्येत चांगली राहील.
सिंह - काही लोक कामात अडचणी निर्माण करु शकतात. परंतु तुमचं लक्ष पूर्णपणे कामाकडे ठेवा. मनातील गोष्टी शेअर करु नका. विश्वासू व्यक्तीसोबतच चर्चा करा.
कन्या - वैवाहिक जीवन उत्तम राहील. जोडीदारापासून कोणतीही गोष्ट लपवू नका. तब्येत चांगली राहील. उत्साही, आनंदी राहाल. आराम करा.
तुळ - अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. इतरांशी असलेल्या तुमच्या चांगल्या वागण्यामुळे गोष्टी अधिक सोप्या होण्यासाठी मदत होईल. परंतु काहीही करण्यापूर्वी त्यावर संपूर्ण विचार करुनच निर्णय घ्या.
वृश्चिक - काही नवीन करण्याची इच्छा होऊ शकते. महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्या. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. व्यवसायात फायदा होईल.
धनु - वेळेचा योग्य उपयोग करा. नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ शकतो. विनाकारण धावपळ करु नका. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा फायदा होईल.
मकर - कामात मन लागणार नाही. वायफळ खर्च होऊ शकतो. काही योजना आखत असाल तर कोणाशी शेअर करु नका. जेवताना काळजी घ्या. अधिक जेवणाने त्रास होऊ शकतो.
कुंभ - उत्साह वाटेल. कामाच्या ठिकाणी समस्यांवर त्वरित मार्ग काढाल. अनेक नवीन विचार मनात येतील. कामं वेळेत पूर्ण होतील.
मीन - तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरु शकतो. अधिक ताण घेऊ नका. काम करताना तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.