मेष- स्वभाव आणि आजचा दिवस अतिशय उत्साह असेल. इतरांची मनं जिंकाल. आत्मकेंद्री वृत्तीची मात्र काळजी घ्या. एखादी नवी संधी मिळेल. ज्यामुळं भविष्यात फायदा होणार आहे.
वृषभ- आजुबाजूला घडणाऱ्या घटनांमुळं काहीसा ताण येऊ शकतो. पण, त्यावर तुम्ही मात कराल. एखाद्या मोठ्या व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळेल. खासजी आयुष्यात काही बदल होतील.
मिथुन- मन शांत ठेवा. परिस्थितीचा विचार करुनच निर्णय़ घ्या. दिवस चांगला आहे. नवे निर्णण घेताना सारासार विचार करणं फायद्याचं ठरेल.
कर्क- अर्थार्जनात वाढ होणार आहे. स्वत:ची काळजी घ्या. अडकलेली कामं मार्गी लावा. शक्य असल्यास ती पूर्ण करा.
सिंह- मानसिक तणाव जाणवू शकतो. मन शांत ठेवा. सारंकाही सुरळीत होणार आहे. इतरांसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढा.
कन्या- शिक्षणाच्या बाबतीत पुढे जाण्याची संधी आहे. महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी दिवस चांगला आहे. काही नवं करण्यासाठी पुढाकार घ्या. फायदा होईल.
तुळ - झोप कमीच असेल. परिस्थितीवर तुमचं नियंत्रण असेल. शांततेनं निर्णय़ घ्या. भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. व्यापार, व्यवसायात फायदा होणार आहे.
वृश्चिक- एखादी शुभवार्ता मिळेल. अनपेक्षित गोष्टी सुखावह ठरतील. दिवस आनंददायी आहे. आपल्या लोकांची काळजी घ्या.
धनु- गोंधळ करु नका. संयमानं पुढे जा. निर्णय घेताना इतरांचाही विचार करा. आज तुम्हाला मित्रमंडळींची मदत मिळणार आहे.
मकर- जोडीदाराच्या मदतीनं आज मोठ्या संकटावर मात कराल. भविष्यातही जोडीदाराची भूमिका महत्त्वाची असेल. दिवस थकवणारा असला तरीही समाधानकारक असेल.
कुंभ- प्रवासयोग आहे. तुमचा दयाळू स्वभाव फायद्याच्या ठरणार आहे. इतरांची काळजी घ्या. एखादी शुभवार्ता मिळेल.
मीन- पूर्ण दिवस कामात व्यतीत होईल. पण, समानाधकारक घटना आनंद देऊन जातील. आरोग्याच्या चिंता दूर होतील. भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय़ घेण्यास पुढाकार घ्या.