Solar Eclipse 2023 : थोड्याच वेळात वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Surya Grahan 2023 : या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण थोड्याच वेळात होणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? सूतक काळसोबत वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स 

नेहा चौधरी | Updated: Oct 14, 2023, 06:34 PM IST
Solar Eclipse 2023 : थोड्याच वेळात वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, जाणून घ्या संपूर्ण माहिती  title=
Solar Eclipse 2023 Surya Grahan 2023 Date 14 october Sutak Kal Solar Eclipse Time Visibility In India Solar Eclipse scientific reason full detail in marathi

Solar Eclipse Timing on 14 October 2023 in India : ऑक्टोबर महिना हा खगोलीय घटनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला थोड्याच वेळात असणार आहे. या सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. या वर्षात पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 झालं होतं. त्यानंतर 5 मे 2023 ला पहिलं चंद्रग्रहण झालं होतं. पण या महिन्यात सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात सर्व माहिती. (Solar Eclipse 2023 Surya Grahan 2023 Date 14 october Sutak Kal Solar Eclipse Time Visibility In India Solar Eclipse scientific reason full detail in marathi)

किती वाजता आहे सूर्यग्रहण ?

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 8.34 ते पहाटे 2.25 असणार आहे. 

भारतात दिसणार का सूर्यग्रहण?

वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे पेनम्ब्रल ग्रहण असणार आहे. त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. 

सूर्यग्रहण म्हणजे काय? 

वैज्ञानिकदृष्टीकोनातून सूर्यग्रहण म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. याला सूर्यग्रहण असं म्हणतात. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर इतकं असतं की चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो. अशा स्थितीत सूर्याभोवती एक वलय निर्माण होतो त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतात. 

सूतककाळ असणार आहे का? 

वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूर्यग्रहणाचा सुतकही वैध राहणार नाही. सूतक काळ म्हणजे या काळात शुभ कार्य केले जात नाही.  भारतात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी सूर्यग्रहणाचा दिवस सामान्य दिनचर्या असेल. 

सर्वपित्री अमावस्येला विधी करता येणार का?

सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होणार आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला पितरांसाठी केलं जाणारं श्राद्ध, तर्पण आदी विधींमध्ये कोणताही अडथळा येणार नसेल. त्याशिवाय अमावस्येच्या रात्री दीपदानाही करता येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट

सर्वपित्री अमावस्याला हे काम करा

सर्वपित्री अमावस्याला पहाटे स्नान करुन गायत्री मंत्राचा जप करा. सूर्यदेवाला जल अर्पण करा. 
1. अमावस्येला पितृदोष आणि गृहदोष दूर करण्यासाठी कार्य करु शकता.
2. सर्वपित्री अमावस्येला सूर्य ग्रहणला सूतक नसल्याने तुम्ही दान धर्म करु शकता.
3. हा दिवस घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हनुमानजींचे पूजन करा.

सूर्यग्रहण काळात खाणेपिणे का निषिद्ध आहे?

सूर्यग्रहण काळात काहीही खाऊ नये, असं धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितलंय. स्कंद पुराणात असेही सांगितलंय की, अन्न खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. सूर्यग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ल्याने सर्व पुण्य आणि कर्मे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. 

या राशींसाठी सूर्यग्रहण शुभ 

नवरात्रीच्या एक दिवस आधी होणारे हे ग्रहण मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.

या राशींसाठी सूर्यग्रहण अशुभ 

मेष, वृषभ, कर्क, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अशुभ असणार आहे. ग्रहणामुळे या राशीच्या लोकांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)