Sindoor Che Upay: घराच्या आर्थिक विवंचनेने चिंतेत आहात ? सिंदूर संबंधित हे 5 उपाय करा, पाहा चमत्कार

Sindoor : तुमची महत्त्वाची कामे होत नाहीत. हातात पैसा कधीच राहत नाही. ही समस्या कायम येत असेल तर तुम्ही सिंदूर संबंधित काही प्रभावी उपाय करु शकता. या उपायांनी तुमचे सर्व कामे त्वरित पूर्ण होतील. 

Updated: Oct 4, 2022, 10:42 AM IST
Sindoor Che Upay: घराच्या आर्थिक विवंचनेने चिंतेत आहात ? सिंदूर संबंधित हे 5 उपाय करा, पाहा चमत्कार title=

Sindoor Remedies: भारतीय संस्कृतीत सिंदूरला खूप महत्त्व आहे. पूजेत सिंदूर अनिवार्य आहे. स्त्रिया देखील आपल्या आवडीनुसार ते केसात भरतात. तसेच त्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात. सिंदूर लाल आणि केशरी रंगाचा असतो. केशरी रंगाचा सिंदूर हनुमानाला अर्पण केला जातो. असे म्हणतात की जो व्यक्ती सिंदूर संबंधित काही विशेष उपाय करतो, त्याची सर्व अनेक कामे बिघडतात, ती पूर्ण होण्यास मदत होते. जाणून घ्या सिंदूर संबंधित अशा 5 उपायांबद्दल.

सिंदूर संबंधित हे उपाय आजच करा

हा उपाय तुम्ही बुधवारी (Sindoor Che Upay)  करु शकता. त्या दिवशी सर्वप्रथम सुपारी घ्यावी. त्यानंतर त्या पानाला सिंदूर आणि तुरटी बांधावी. यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार पिंपळाच्या झाडाखाली दगडाने दाबून ठेवावी. परत येताना, मागे वळून पाहू नका. हा उपाय सलग 3 बुधवारी केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि घरामध्ये धनाची वाढ होईल. 

हा उपाय (Sindoor Che Upay) हनुमानजीशी संबंधित आहे. मंगळवार किंवा शनिवारी तुम्ही त्याचा अवलंब करु शकता. घरातील त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींच्या मूर्तीवर सलग 5 आणि 5 मंगळवारी सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. यासोबतच हनुमानजींना हरभरा आणि गूळ अर्पण करा. भोगानंतर तो प्रसाद लोकांमध्ये वाटावा. या उपायाने तुमचे अडलेली सर्व कामे आपोआप पूर्ण होतील. 

परीक्षेत यश मिळवण्यासाठी हा उपाय करा

पुन्हा पुन्हा परीक्षा देऊनही त्यात यश मिळत नसेल तर, तुम्ही इंटरव्ह्यू दिल्यानंतर आलात, पण तुम्हाला नोकरीसाठी फोन आला नाही, सिंदूराचा उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. शुक्ल पक्षातील पुष्य योग किंवा गुरु पुष्य योगात मंदिरात जाऊन गणेशाला सिंदूर अर्पण करावा. या उपायाचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल. 

 खूप मेहनत करुनही पैसा तुमच्याकडे राहत नाही. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. जर तुमच्यासोबत अशी परिस्थिती असेल तर सिंदूरचा उपाय करणे तुमच्यासाठी चांगले होईल. तुम्ही नारळावर सिंदूर लावून लाल कपड्यात बांधा आणि मग त्याची पूजा करा. यानंतर माता लक्ष्मीचे स्मरण करुन ते नारळ कपाटात ठेवा. लवकरच तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत फरक स्पष्टपणे दिसेल. 

या उपायाने घरातील वास्तुदोष दूर होतो

जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे, जो तुम्हाला कसा दूर करायचा हे समजत नसेल. तर रोज सकाळी उठून घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर लावा. यासोबतच मुख्य गेटवर गणेशजींची छोटी मूर्ती किंवा सिंदूर लावा. असे मानले जाते की असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)