Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Updated: Nov 27, 2022, 07:23 PM IST
Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा title=

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे. आता 20 नोव्हेंबरला शुक्र ग्रहाचा उदय झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे. या ग्रहाती शनि आणि सूर्याशी मैत्रपूर्ण संबंध आहे. अशा स्थितीत वृश्चिक राशीत शुक्राच्या उदयामुळे काही राशींना भाग्याची साथ मिळेल. शुक्र ग्रहाच्या उदयामुळे काही राशींसाठी अच्छे दिन सुरु झाले आहेत. या चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या लोकांना शुक्राच्या या स्थितीचा लाभ मिळेल.

वृषभ- शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू झाला आहे. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. यामुळे धनलाभ होईल. व्यवसायातही खूप फायदा होईल. या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.

तूळ- शुक्र देखील तूळ राशीचा स्वामी आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना या स्थितीचा मोठा फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे घर आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवन मधुर राहील. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते.

बातमी वाचा- Lal Kitab: आर्थिक अडचणीत आहात! लाल किताबमधील 'हे' चमत्कारीक तोडगे वापरा

कर्क- कर्क राशीच्या लोकांनाही शुक्राच्या उदयामुळे खूप फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे प्रचंड पैसा मिळू शकेल. व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. जोडीदारासोबत मधुर संबंध प्रस्थापित होतील.