Shukra Gochar 2022: 18 जूनपासून चमकणार या राशीच्या लोकांचं नशीब

शुक्र ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत करणार प्रवेश, याचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम जाणून घ्या

Updated: Jun 17, 2022, 12:12 PM IST
Shukra Gochar 2022: 18 जूनपासून चमकणार या राशीच्या लोकांचं नशीब title=

मुंबई : प्रत्येकाला वाटत असतं की आपली वेळ बदलावी. पण त्यासाठी काही काळ जावा लागतो. 18 जूनपासून शुक्र ग्रह आपली रास बदलत आहे. याचा परिणाम काही राशींवर होणार आहे. शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा परिणाम काही राशींवर चांगला होणार तर काही राशींना सावध राहावं लागणार आहे. 

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे ज्याच्याशी त्याचा छत्तीसचा आकडा आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत, वृषभ हे खजिना आहे, हा निधी श्वास, वाणी, पैशाची बँक आहे. शुक्राच्या आगमनाने वृषभ राशीचा शुभ काळ वाढेल. 13 जुलै 2022 पर्यंत बुध येथे राहील. ग्रहांच्या या हालचालीचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया तुमच्या राशीवर काय होणार परिणाम.

मेष : या राशीच्या लोकांना तोंडात साखर ठेवून बोलावं लागणार आहे. सत्य किंवा कटू बोलल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या समस्यांवर मात करण्यासाठी गोड बोलून मार्ग काढावा लागेल. आर्थिक फायदा होईल. 

वृषभ : या राशीच्या लोकांनी स्वत: कडे लक्ष द्यायला हवं. पर्सनालिटी डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. चांगली संगत फार महत्त्वाची आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. 

मिथुन : परदेशात जाण्याची संधी मिळेल. या कालावधीत तुम्ही तुमच्या पैशांचा चांगला उपभोग घेऊ शकता. फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की करा. देवीच्या मंदिरात जाण्याची योजना असेल तर नक्की दर्शन घ्या. 

कर्क : मोठ्यांचं सहकार्य लाभेल. महिलांनी विवाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावेत. नवा मोबाईल घेऊ शकता. 

सिंह : आळशीपणा वाढेल, कोणतेही काम करण्याआधी नियोजन करा. तंत्रज्ञानाच्या मदतीनं कामं सोपी होतील. कामावर लक्ष द्या. मेहनतीशिवाय पर्याय नसेल त्यामुळे शॉर्टकटमुळे नुकसान होईल. 

कन्या : या राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील, प्रमोशन होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळावेत त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. 

तुळ : कोणतीही गोष्ट माहिती काढल्याशिवाय करू नका. गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

वृश्चिक : काही चांगल्या आणि जुन्या लोकांच्या भेटीगाठीचा योग आहे. जुने मित्र भेटतील. पार्टनरशिपमध्ये काही करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी योग्य वेळ आहे. 

धनु : स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चांगला लाभ मिळेल. बँकिंग, सीए क्षेत्रातील लोकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. ट्रान्सफर होऊ शकते प्रेमोशनचीही शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी कृशल आहे. त्यामुळे धीरानं घ्या. 

मकर : या राशीच्या लोकांना ऊर्जा टिकवणं फार महत्त्वाचं असणार आहे. सकारात्मक विचार करत राहा. आपल्याला चांगली बातमी मिळेल. 

कुंभ : घराकडे नीट लभ द्या. अडकलेली कामं पूर्ण होतील. आज इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा चांगला योग आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. 

मीन : बँकिंग, फॅशन डिझाइनिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. पार्टनरसोबत नेहमी पॉझिटिव्ह राहा. संयम राखा

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )