Venus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी

Shukra Gochar 2023: नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रह स्वत:च्या स्वभावानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह धन-वैभव, सुख-सुविधा आणि प्रेम सौंदर्य यांचा कारक आहे. तर शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे या दोन ग्रहांची युती प्रभावी ठरते. 

Updated: Dec 30, 2022, 03:47 PM IST
Venus Transit : शनिच्या राशीत शुक्रानं मारली एन्ट्री, 'या' राशींसाठी प्रवेश ठरणार लाभदायी title=

Shukra Gochar 2023: नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहांचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. प्रत्येक ग्रह स्वत:च्या स्वभावानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह धन-वैभव, सुख-सुविधा आणि प्रेम सौंदर्य यांचा कारक आहे. तर शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे या दोन ग्रहांची युती प्रभावी ठरते. 2022 वर्ष संपण्यापूर्वी शुक्र ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत आता शनि-शुक्र युती होणार आहे. या युतीचा राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येईल. शनि आणि शुक्रामध्ये मैत्रिपूर्ण संबंध असल्याने 4 राशींना या युतीचा फायदा होईल. शुक्र ग्रह 22 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशीत असणार आहे. त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करणार असून 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत शनि-शुक्र युती असेल.

शनि शुक्र युतीचा या राशींना होणार फायदा

मेष- मकर राशीत शनि-शुक्र युती होणार असल्याने मेष राशीच्या लोकांना फायदा होईल. या जातकांना कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळतील. तसेच कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. धनलाभाचा प्रबळ योग असणार आहे. जीवनात सुख-सुविधा मिळतील.

कन्या- शुक्र-शनि युती कन्या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात अविवाहितांची लग्न ठरू शकतात. महिलांना या काळात विशेष लाभ मिळेल. तसेच व्यवसायिकांना या काळात चांगला लाभ मिळेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. 

मकर- या राशीसाठी 22 जानेवारी 2023 पर्यंतचा काळ शुभ असणार आहे. अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. कठीण कामं या काळात चुटकीसरशी पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

बातमी वाचा- Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

तूळ- या राशीसाठी शनि-शुक्राची युती लाभदायी ठरेल. वरिष्ठांकडून अडचणींच्या काळात साथ मिळेल. त्यामुळे करिअरमधील पुढील वाटचालीसाठी फायदा होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)