Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच एका राशीत 30 वर्षांनी शनिदेव येतात. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 30 वर्षांनी शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत येणार आहे. यामुळे काही राशी त्यांच्या दृष्टीक्षेपात येणार आहेत. धनु राशीची साडेसाती आणि तूळ-मिथुन राशीची अडीचकी संपणार आहे. तर मीन राशीला साडेसाठी आणि कर्क-वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होणार आहे. शनिदेव कुंभ राशीत 29 मार्च 2025 पर्यंत असणार आहेत. या स्थितीचा चार राशींना फायदा होणार आहे, चला जाणून घेऊयात..
मेष- या राशीच्या जातकांना शनि गोचर फलदायी ठरणार. आर्थिक अडचणी या काळात दूर होतील. तसेच कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात अचानक लाभ होऊ शकतो. तसेच पैशाचे नवे मार्ग तयार होतील.
वृषभ- या जातकांना शनिदेवाची साथ मिळणार असल्याने कामं झटपट होतील. प्रत्येक कामात यश मिळताना दिसेल. अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम यात यश मिळेल. अविवाहतांचा विवाह या काळात जमेल.
बातमी वाचा- देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
धनु- या राशीच्या जातकांची साडेसातीतून सुटका होणार आहे. शनिचा प्रभाव दूर होत असल्याने आरामदायी जीवन सुरु होईल. कारण साडेसातीच्या काळात असलेल्या तणावातून सुटका होईल.
कुंभ- शनिदेव गोचर करत कुंभ राशीत येणार आहेत. पण ही शनिदेवांची स्वरास आहे. या राशीचे स्वामी असल्याने जातकांना फायदा होईल. नवी नोकरी मिळू शकते. या काळात मोठं काम तुमच्या हातून होऊ शकतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)