शुभ संकेत शुक्राची 3 राशींवर चांगली कृपादृष्टी, बदलणार नशीब

शुक्र 31 मार्च रोजी  कुंभ राशीत प्रवेश करत आहे. सध्या मकर राशीतून तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. 

Updated: Mar 5, 2022, 07:05 PM IST
शुभ संकेत शुक्राची 3 राशींवर चांगली कृपादृष्टी, बदलणार नशीब title=

मुंबई : 12 राशींपैकी प्रत्येक राशीसाठी सगळे दिवस काही सारखे नसतात. कधी चढउतार तर कधी आर्थिक समृद्धी आणणारे असतात. 12 राशींपैकी आता 3 राशींसाठी येणारा काळ खूप शुभ असणार आहे. आर्थिक स्थिती, सुख आणि संपत्ती चांगली असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 31 मार्चनंतर 3 राशींचं नशीब पालटणार आहे.

शुक्र 31 मार्च रोजी  कुंभ राशीत प्रवेश करत आहे. सध्या मकर राशीतून तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. शुक्र हा खरं तर तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी म्हणून ओळखला जातो. मीन राशीसाठी उच्च तर कन्या राशीसाठी धोक्याचा मानला जातो असं सांगतात. जाणून घेऊया शुक्र गोचरचा कोणत्या राशीला फायदा होणार आहे. 

मेष (Aries) : या राशीचे तरुण-तरुण लग्नाचे असतील तर त्यांचा उत्तम योग आहे. त्यांचं लग्न जमण्याची शक्यता आहे. हा काळ तुम्हाला आर्थिक समृद्ध करणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होईल. नवे स्त्रोत निर्माण होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. 

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या 9 व्या घरात शुक्र प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या घरात प्रवेश केल्यानंतर या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचे हे संकेत आहेत. प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काळ उत्तम आहे. भागीदारी व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. 

मकर  (Capricorn) : या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. आर्थिक वृद्धीचे स्त्रोत बनतील. कामामध्ये प्रगती होणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक वृद्धी होईल आणि व्यवसायात नवे डिल्स होतील. 

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.