Shatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस!

Shani Gochar 2023: शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात. 

Updated: Feb 27, 2023, 03:55 PM IST
Shatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस! title=
shatabhisha nakshatra,Shani Gochar 2023

Shani Rashi Parivartan : प्रत्येक ग्रह वेळोवेळी विशिष्ट स्थितीत बदलत असतो. अशातच येत्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये शनी शतभिषा नक्षत्रात (Shatabhisha Nakshatra) प्रवेश करणार आहे. 14 मार्च रोजी शनि शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे. ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आयुष्यावर देखील होताना दिसतो. शनी देवाने रस्ता बदलल्याने त्याचा अनेक राशींवर (Astro Tips) परिणाम होणार आहे.

तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात. शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. त्यामुळे 6 राशींच्या लोकांवर थेट परिणाम होणार आहे.

आणखी वाचा - Holika Dahan 2023: होळीवर भद्राची सावली? महाराष्ट्रात आणि इतर राज्यात कधी आहे होलिका दहन?

कोणत्या 6 राशींवर भाग्य उजळणार?

मेष - तुम्ही जर व्यायसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. हा कालावधीत आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रत्येक कामात यश देखील मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन - मिथुन राशीवाल्यांना परदेशात शिकण्याचं असेल किंवा नोकरीसाठी प्रयत्न सुरू असतील तर त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शनी देवाची कृपा असेल पण मेहनत कमी करू नका.

सिंह - तुमचं करिअर, यश आणि नोकरी या तिन्ही गोष्टीच्या दृष्टीने या काळ चांगला ठरेल.  नोकरदारांना  चांगल्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायात उत्तम संधी मिळेल.

तूळ - ज्या लोकांना जॉब स्विच करायचा आहे किंवा व्यावसायात बदल करायचे आहेत. त्या लोकांसाठी हा चांगला काळ असू शकतो. नुकसान सहन करण्याची ताकद ठेवा, सुरूवात मात्र चांगली होईल.

धनु - तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनात असेल ती नोकरी मिळण्याची शक्यता आहे, तर व्यावसायिक लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

मकर - मकर राशीवाल्यांना सुरू केलेलं काम, व्यवसाय दीर्घकाळ लाभ देईल. त्याच्या खासगी मालमत्तेत देखील चांगली वाढ होईल.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)