Shani Vakri 2023 : फक्त इतके दिवस...पुन्हा होणार शनि वक्री! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Saturn Retrograde 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार कर्म दाता शनिदेव संपूर्ण 140 दिवस प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. याचा अर्थ तो शनि वक्री म्हणजे उलट दिशेने फिरणार आहे. याचा फायदा काही राशींना होणार आहे. काही राशींसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Apr 25, 2023, 09:05 AM IST
Shani Vakri 2023 : फक्त इतके दिवस...पुन्हा होणार शनि वक्री! 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस title=
shani vakri 2023 these zodiac signs will get benefit and money Astrology in marathi

Surdas Jayanti 2023 : ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या रंजक जग आहे. कोणता ग्रह केव्हा संचार करेल, कोणत्या राशीत आणि काय परिणाम होईल, या सगळ्याचा अभ्यास ज्योतिषशास्त्रात केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रह गोचरचा आपल्या आयुष्यावर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव ही न्यायाची देवता आहे. 

सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनि सतीचा (Shani Sade Sati) प्रभाव चालू आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि धैय्या (Shani Dhaiya) आहे. 17 जून 2023 पासून शनि वक्र होणार आहे म्हणजेच शनि उलटी हालचाल सुरू करणार आहे. कुंभ राशीत 140 दिवस प्रतिगामी राहिल्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला शनी वक्र होणार आहे. यामुळे काही राशींवर झमाझम पैसा बरसणार आहे. (shani vakri 2023 these zodiac signs will get benefit and money Astrology in marathi)

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्र शुभ राहणार आहे. व्यावसायमध्ये फायदा होणार आहे. रखडलेले कामं मार्गी लागणार आहेत. मात्र या काळात कोणालाही पैसा चुकूनही उधार देऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना त्यांचा कामाचं फळ मिळणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना परदेशी जाण्याच योग आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कोर्टकचेरीतील प्रकरण मार्गी लागेल. तुमच्या डोक्यावर कर्ज असल्यास ते फेडण्यात तुम्हाला यश मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होईल. शत्रूंना उत्तर देण्यास सफल व्हाल. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्र खूप भाग्यशाली ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली होणार आहे. चांगल्या नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी शनि वक्र फलदायी ठरणार आहे. आर्थिक लाभ आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. आर्थिक प्रगतीसोबतच चांगली गुंतवणूक करणार आहे. भविष्यात या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. एखादी मालमत्ता विकायची असेल तर हा काळ योग आहे. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. विवाह इच्छुकांचे लग्न जमणार आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)