Shani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी

Shani Guru Gochar: ज्योतिषशास्त्रीय गणितं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कुठे नजर आहे यावर सर्वकाही अवलंबून असतं. शनिदेवांनी 30 वर्षानंतर स्वराशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ झाली आहे.

Updated: Jan 17, 2023, 06:30 PM IST
Shani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी title=

Shani Guru Gochar: ज्योतिषशास्त्रीय गणितं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कुठे नजर आहे यावर सर्वकाही अवलंबून असतं. शनिदेवांनी 30 वर्षानंतर स्वराशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ झाली आहे. शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह असून अडीच वर्षांनी राशी बदल करतो. तर गुरु ग्रह एका राशीत एक वर्ष ठाण मांडतो. सध्या गुरु ग्रह मीन राशीत असून 22 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत गोचर करणार आहे. शनिनंतर गुरु ग्रहाने गोचर करताच अखंड साम्राज्य योग जुळून येणार आहे. तीन राशींना आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बराच फरक दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत. 

अखंड साम्राज्य योगामुळे लाभ

मेष- शनि आणि त्यानंतर गुरूच्या गोचरामुळे अखंड साम्राज्य योग तयार होणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. यामुळे जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना या काळात फायदा होईल. याशिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळेल. कर्जाचा डोंगर या काळात हलका होईल. शासनाशी निगडीत कामातून लाभ होईल.

मिथुन- या राशीच्या लोकांनी शनिच्या अडीचकीतून सुटका होईल. त्याचबरोबर अखंड साम्राज्य योगाचा फायदा देखील होईल. गुरु ग्रहानं गोचर करताच हा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. या काळात पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजारातील गुंतवणूक फलदायी ठरेल.

बातमी वाचा- Shani Gochar: शनिदेवांना प्रसन्न करण्याची संधी! कुंभ राशीतील गोचरानंतर अमावास्येला विशेष योग

मकर- या राशीच्या लोकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु होणार आहे. असं असताना शेवटच्या चरणात लाभदायी ठरेल असं दिसतंय. गुरु ग्रहाचा गोचर झाल्यानंतर अखंड साम्राज्य योगाचा फायदा दिसून येईल. या काळात आत्मविश्वास वाढेलच त्यासोबत मानसन्मान देखील मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. तसेच लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)