Shani Guru Gochar 2023 : 'या' 3 राशींमध्ये तयार होणार अखंड साम्राज्य योग! नशीब रातोरात होणार बदल

Saturn and Jupiter Transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार शनिचं संक्रमण झालं आहे. आता गुरुचं संक्रमण होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचे काही शुभ आणि काही लोकांना अशुभ परिणाम भोगावे लागतात. गुरुचं संक्रमण हे 3 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ योग घेऊन आला आहे.

Updated: Jan 27, 2023, 02:30 PM IST
Shani Guru Gochar 2023 : 'या' 3 राशींमध्ये तयार होणार अखंड साम्राज्य योग! नशीब रातोरात होणार बदल title=
Shani Guru Gochar 2023 3 zodiac sign people change life for Got a lot of money

Akhanda Samrajya Yoga 2023  :  ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीतील बदलांमुळे आपल्या आयुष्यात चांगले किंवा वाईट परिणाम दिसतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बदल्याने राशीनुसार परिणाम होतो. काही योग हे खूप शुभ असतात तर काही लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. 17 जानेवारीला शनी संक्रमण करून त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता 22 एप्रिल 2023 ला गुरु संक्रमण होणार आहे. शनि आणि गुरूचं 3 राशींमध्ये होणारे संक्रमण हा अखंड साम्राज्य योग घेऊन येतं आहे.  शनि हा कर्म आणि न्यायाची देव आहे तर देवगुरू बृहस्पति हा भाग्यवृद्धी करणारा ग्रह आहे.  (Shani Guru Gochar 2023 3 zodiac sign people change life for Got a lot of money)

या राशीच्या लोकांचं भविष्य बदलणार 

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी अखंड साम्राज्य योग खूप शुभ सिद्ध होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात लाभ होऊन नफा वाढेल. शेअर बाजारातून त्यांना पैसा मिळेल. 

मिथुन (Gemini)

 मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ संकेत घेऊन आला आहे. या लोकांची पैशाची टंचाई दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधार आहे. नोकरदार लोकांसाठी बढतीचे योग आहेत. शिवाय वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. जर एखादे मोठे न्यायालयीन प्रकरण असेल तर ते तुमच्या बाजूने निकाल लागेल. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा अखंड साम्राज्य योग खूप समृद्धी घेऊन येणार आहे. पैशांची बरसात होणार आहे, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)