Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिदेवांना (Shani Dev) एका राशींतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशींच्या पुढच्या आणि मागच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव राहतो. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत असून मकर राशीत आहेत. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनिदेव मार्गस्थ होणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनि या अवस्थेत राहणार आहे. त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत शनिदेव घनिष्ठा नक्षत्रात राहणार असून हे मंगळ ग्रहाचं नक्षत्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि शनि यांच्यात शत्रुत्व आहे. असं असलं तरी पाच राशींना या काळात चांगली फळं मिळणार आहेत.
मकर (Makar)- मकर राशीच्या लोकांवर सध्या शनिची साडेसाती सुरू असली तरी शनि मार्गी होत असल्याने बराच दिलासा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पैसे मिळतील आर्थिक अडचणी दूर होतील. या काळात शनिदेवाची पूजा केल्यास फायदा होईल.
कुंभ (Kumbh)- कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव आहे. शनि मार्गस्थ होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी दूर होतील. या काळात शुभ परिणाम मिळू लागतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.
धनु (Dhanu)- या राशीच्या लोकांवरही शनिची साडेसाती आहे. 23 ऑक्टोबरपासून शनीच्या मार्गक्रमणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. करिअरमध्ये प्रमोशन रखडलं असेल तर मिळेल. कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
Laxmi Puja: लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचा प्रसाद का असतो? जाणून घ्या यामागचं कारण
मिथुन (Mithun)- या राशीच्या लोकांवर शनिची अडीचकी सुरु आहे. मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या मार्गक्रमणामुळे दिलासा मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. धनलाभ होईल.
तूळ (Tula)- तूळ राशीच्या लोकांवरही शनि अडीचकीचा प्रभाव आहे. शनि मार्गक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. या काळात उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घरातील सदस्यांच्या मदतीने मोठे काम पूर्ण होईल. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)