Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब

Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jul 23, 2023, 09:13 AM IST
Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब title=
shani and venus will make khappar yoga 3 zodiac sign get money

Khappar Yog : आज शुक्र वक्रीमुळे शनि आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय धोकादायक असा खप्पर योग तयार झाला आहे. अधिकमासातील हा अशुभ योग काही राशींच्या आयुष्यात आर्थिक संकट आणणार आहे.  हा खप्पर योग पाच बुधवार, पाच गुरुवारसोबत शुक्र आणि शनि यांच्या प्रतिगामीमुळे निर्माण होतो आहे. हा जरी खतरनाक योग असला तरी तीन राशींच्या लोकांसाठी तो अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. (shani and venus will make khappar yoga 3 zodiac sign get money )

मेष (Aries)

खप्पर योगामुळे मेष राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहे. या लोकांचं उत्पन्न वाढणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत गवसणार आहे. तुमची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. करिअरमध्येही तुमची प्रगती होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. 

वृषभ (Taurus)

खप्पर योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले दिवस येणार आहेत. प्रत्येक कामात तुम्ही यश संपादन करणार आहेत. शुक्र आणि शनीची प्रतिगामी गतीमुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अचानक तुम्हाला प्रचंड धनलाभ होणार आहे. वडीलधारी मंडळीची तुम्हाला या काळात साथ मिळणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - येत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी 

मिथुन (Gemini)

खप्पर योग मिथुन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. तुमचं भाग्य या योगामुळे उजळणार आहे. धार्मिंक कार्यात तुमची रुची या काळात वाढणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती आणि यश दोन्ही तुमच्यासोबत असणार आहे. आर्थिक स्ठिती या काळात मजबूत आणि वाढी असणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे सुख समृद्धी घरात नांदणार आहे. तर विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याचे योग आहेत. 

हेसुद्धा वाचा - 'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )