Sawan Somwar Shubh Yog : आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते श्रावण महिन्याचे...गुरुवारी 29 जून 2023 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. त्यानंतर उत्तर भारतीय लोकांचा सावन म्हणजे श्रावण महिना हा 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा सर्वात उत्तम महिना. हा महिना भोलेनाथाला आवडतो असं म्हणतात. यंदाचा श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. तर महाराष्ट्रातील श्रावणाला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 17 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
श्रावणासोबत अधिमास, म्हणजेच मलमास किंवा पुरुषोत्तम महिन्या आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात 4 नाही तर 8 सोमवारचे व्रत करायचे आहेत. हिंदू धर्मानुसार या महिन्यात शिवाची पूजा केल्यामुळे खूप मोठं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. 4 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावणातील पहिला सोमवार अतिशय खास आहे. (sawan somwar 2023 start date frist somwar made Ravi Yoga Gajkesari Yog and puja shiv puja monday Sawan Somwar Shubh Yog)
श्रावणातील पहिला सोमवार हा 10 जुलैला असणार आहे. पंचांगानुसार यादिवशी अतिशय शुभ असा रवि योग तयार झाला आहे. त्याशिवाय अशुभ पंचक कालही संपणार आहे. विशेष म्हणजे गुरु आणि चंद्र यांच्या भेटीमुळे गजकेसरी हा शुभ राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणात स्वामी श्री हरी आणि शंकर भगवान या दोघांचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग जुळून आला आहे.
श्रावणासोबत अधिकमास आल्यामुळे जसं 4 श्रावण सोमवार नाही तर 8 सोमवारचे व्रत पाळायचे आहेत. तसंच यंदा मंगळा गौरी (Mangla Gauri Vrat 2023) व्रताची संख्याही यंदा 9 आहे. तर श्रावणातील एकादशी व्रताची संख्याही चार आहे.
हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, श्रावण सोमवार उपवास केल्याने मनुष्याचे भाग्य बदलते आणि भगवान शंकराची अपार कृपा प्राप्त होते. त्याशिवाय वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख - समृद्धीसाठी श्रावण सोमवारचं व्रत महिला करतात. शंकर भगवान हे ग्रह-नक्षत्रांचे स्वामी असल्याने सर्व दोष मुक्तीसाठी श्रावण सोमवार अतिशय शुभ मानला जातो.
श्रावण सोमवारचं व्रत हे ब्रह्म मुहूर्तापासून संध्याकाळपर्यंत पाळला जातो. यादिवशी सकाळी लवकर उठून स्ना करा. मंदिरात जाऊन किंवा घरातील शिव लिंगावर गंगाजल, पाणी, बेलपत्र, सुपारी, फुले, फळे, भांग, धतुरा इत्यादी वस्तू अर्पण करा. त्यानंतर सोमवारची कथा वाचा. कथेनंतर शिव मंत्रांचा जप करा.
पहिला श्रावण सोमवार - 24 जुलै
दुसरा श्रावण सोमवार - 31 जुलै
तिसरा श्रावण सोमवार - 14 ऑगस्ट
चौथा श्रावण सोमवार - 21 ऑगस्ट
पाचवा श्रावण सोमवार - 28 ऑगस्ट
सहावा श्रावण सोमवार - 14 ऑगस्ट
सातवा श्रावण सोमवार - 04 सप्टेंबर
आठवा श्रावण सोमवार - 11 ऑगस्ट
पहिला श्रावण सोमवार - 10 जुलै
दुसरा श्रावण सोमवार - 17 जुलै
तिसरा श्रावण सोमवार - 24 जुलै
चौथा श्रावण सोमवार - 31 जुलै
पाचवा श्रावण सोमवार - 7 ऑगस्ट
सहावा श्रावण सोमवार - 14 ऑगस्ट
सातवा श्रावण सोमवार - 21 ऑगस्ट
आठवा श्रावण सोमवार - 28 ऑगस्ट