Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?

Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.

Updated: Dec 17, 2022, 09:32 AM IST
Astrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का? title=
Roti Related Rules Roti or bhakri piece Powerful Remedies to remove evil eye effects Astrology tips nmp

Evil Eye Remedy Roti Related Rules : आपण अनेक वेळा ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की एखाद्याचं काम होतं नसेल किंवा सारखा एखादा व्यक्ती आजारी पडतं असेल तर त्याला वाईट नजर लागली असं म्हणतात. मग ज्योतिषशास्त्रात  (Jyotish Shastra) वाईट नजर उतविण्यासाठी दृष्ट  (Nazar Dosh) काढण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक लोकांना जीवनात नकारात्मकता आणि अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शास्त्रानुसार ( Astrology ) पोळी किंवा चपाती भाकरी याचा उपाय करुन तुम्ही नकारात्मक नजर दूर  (Evil Eye Remedy) करु शकता.

चपाती वाईट नजर दूर करेल

मीठ किंवा लाल तिखट सहसा वाईट नजर काढून टाकण्यासाठी वापरले जाते. पण जर तुम्हाला त्याचाही फायदा मिळत नसेल तर रोटीचा हा उपाय खूप फलदायी ठरतो. रोटीच्या उपायाचा अवलंब केल्याने तुम्ही वाईट नजरेपासून मुक्त होऊ शकता. (Roti Related Rules  Roti or bhakri piece Powerful Remedies to remove evil eye effects Astrology tips)

 

हेसुद्धा वाचा -  Touch Wood : टचवुड का करतात तुम्हाला माहिती आहे का?

 

काय आहे मानता 

आजीच्या पोळी, भाकरी या दोन्ही पदार्थात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. यामुळे नजर काढण्यासाठी पोळीचा किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्याचा सल्ला दिला जातो. 

 

हेसुद्धा वाचा -  Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

 

दृष्ट काढताना हे करा!

यासाठी प्रथम एक रोटी बनवा आणि लक्षात ठेवा की रोटी फक्त एका बाजूने भाजून घ्या. आता भाजलेल्या भागाला तेल लावून त्यात लाल तिखट आणि मीठ ठेवा. यानंतर ज्या व्यक्तीला नजर लागली आहे. त्या व्यक्तीवरुन रोटी सात वेळा काढून शांतपणे एका चौरस्त्यावर ठेवावी. हे काम करताना कोणतीही अडवणूक होता कामा नये हे ध्यानात ठेवावं. असं मानलं जातं की भाकरीच्या या उपायाचा अवलंब केल्याने वाईट नजरेचा दोष देखील एका चुटकीमध्ये नाहीसा होतो आणि तुम्हाला त्वरित आराम मिळतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)