Chanakya Niti: प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असते. चाणक्यांच्या मते, तुमच्या जीवनात सद्गुणी, हुशार आणि ज्ञानी व्यक्तीचा सहवास खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर माणसांच्या काही वाईट सवयी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. अशा वेळी, नात्यात दुरावा निर्माण होतो. आज चाणक्य नीतीमध्ये मुलांच्या अशा सवयी जाणून घेणार आहोत, ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत. एवढेच नाही तर या सवयी पाहून मुली मुलांना आयुष्यातून बेदखल करायला वेळ लागत नाही. (Chanakya Niti For Relationship)
मुलांच्या अशा सवयी ज्या मुलींना आवडत नाहीत... (Relationship Advise By Chanakya)
मुलांच्या खोट्या गोष्टींचा तिरस्कार
खरं तर सगळ्याच मुली खोटं बोलत नाहीत. त्यामुळे समोरचा जर खोटं बोलत असेल तर अशा मुलांचा मुलींना प्रचंड राग येतो. महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलासोबत मुली पूर्ण आयुष्य राहण्याचा विचार करतात आणि त्याच मुलाने जर खोट काही बोललं किंवा काही लपवलं तर मुली अशा मुलांना आयुष्यातून बेदखल करतात.
मुलांचं नशा करणं
आजकाल मुलगा आणि मुलगी दोघेही नशा करतात. पण नात्याबाबत गंभीर असणाऱ्या मुलींना मुलांची नशा करणं अजिबात मान्य नसतं. वाईट व्यसन असलेली मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. सिगारेट आणि दारूमुळे घर उद्ध्वस्त होतं. त्यामुळे मुलींना अशा प्रकारच्या मुलांपासून दूर राहतात.
स्वार्थी मुलं
कोणतही नातं प्रेम, विश्वासावर अवलंबून असतात. (Love and trust) जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी त्याग करणार नाही, काळजी घेणारा स्वभाव दाखवणार नाही, तर अशा मुलांसोबत आयुष्य घालवण्याचा विचार मुली करत नाहीत. आचार्य चाणक्य म्हणतात की जी मुले स्वार्थी असतात, मुली त्यांना त्यांच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)