Rashi Parivartan 2022: ज्योतिषशास्त्रानुसार मेष ते मीनपर्यंत 12 राशी आहेत. या 12 राशींमध्ये 9 ग्रहांचं गोचर होत असतो. या गोचराचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होत असतो. ग्रहांची स्थिती, स्थान, नक्षत्र राशींनुसार परिणाम देत असतात. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार ग्रहांच्या स्थिती आणि महादशा-अंतर्दशा यावर अवलंबून असते.
ग्रहाचा गोचर म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यापासून राहु केतुपर्यंत सर्व ग्रहांची स्वत:ची एक गती आहे. नवग्रहांमध्ये चंद्राचे संक्रमण सर्वात कमी कालावधीचं असून दर सव्वा दोन दिवसांनी गोचर करतो. तर शनिच्या संथ गतीमुळे अडीच वर्षांनी राशी बदल करतो. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची चलबिचल पाहायला मिळेल. सूर्य, बुध, शुक्र राशी बदल करणार आहे.
सप्टेंबर 2022
मिथुन: सप्टेंबर महिन्यात तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे सुख आणि मातेच्या स्थानात मंगळ आणि सूर्य हे दोन्ही अग्नि तत्वाचे भ्रमण असेल. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना या काळात कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला संयमाने पुढे जाण्याचा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
सिंह: सप्टेंबर महिन्यात 16 तारखेला सूर्य ग्रह तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. या स्थानात मंगळ 6 सप्टेंबरपासून विराजमान असेल. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात तुम्ही तुमच्या बोलण्याने एखाद्याला दुख होऊ शकतो. तथापि, महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या तृतीय भावात शुक्राचे भ्रमण असल्यामुळे कला, शिक्षण इत्यादी क्षेत्रात यश मिळू शकते.
कन्या: या महिन्यात सूर्य आणि मंगळ तुमच्या राशीत भ्रमण करणार आहेत. त्यामुळे हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. तुमचे मन शिक्षण आणि धार्मिक कार्यांपासून दूर जाऊ शकते. यासोबतच तुमच्या राशीतील सूर्य आणि मंगळाची स्थिती तुम्हाला नाराज करू शकते. या काळात रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग-ध्यानाची मदत घ्यावी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)