मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
आजच्या दिवशी वडीलधारी मंडळींचा आदर करावा. आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. घरी पाहुणे येण्याचे योग आहेत.
दररोजपेक्षा तुमचा आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. घरात स्वच्छतेवर लक्ष द्यावे लागेल. धनलाभाचे योग आहेत.
या राशीच्या व्यक्तींना आज कमी धावपळ करावी लागेल. तुमच्या जवळच्या मित्रासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल.
तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावी. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
आजच्या दिवशी कोणाशीही ऑफिसमध्ये वाद घालू नका. तसंच रखडलेली कामं होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका.
आजच्या दिवशी तुम्ही नोकरीत प्रगती साधाल. नवं घर खरेदी करण्याचे योग आहेत. परिश्रमाचे फळ मिळेल.
आजच्या दिवशी तुमच्या घरातील कौटुंबिक कलह चव्हाट्यावर येईल. तसंच अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. वडिलांची समजूत काढावी लागेल.
आजच्या दिवशी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. मनोरंजनावर खर्च होईल.
आज दिवसभर आळस राहणार आहे. संतती प्राप्तीचे योग आहेत. कोणालाही पैसे उधार देऊ नका.
महत्त्वाची कामं बिघडू शकतात. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
आजच्या दिवशी मालमत्तेशी संबंधित वाद वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू नका. नोकरीत बदल करू शकता.
आजच्या दिवशी कामाचा ताण राहील. अतिरिक्त खर्च होतील. नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.