Dhanteras 2023: 59 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

बृहस्पति स्वतःच्या राशीत मेष राशीत असणार आहे. यावेळी शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्या राशीत असणार आहे आणि सूर्य तूळ राशीत असणार आहे. यासोबतच शनिदेवही जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 8, 2023, 10:30 AM IST
Dhanteras 2023: 59 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत title=

Dhanteras 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, या वर्षी धनत्रयोदशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. अशा स्थितीत काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. 

हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. सोने-चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी धनत्रयोदशीचा दिवस खूप खास आहे, कारण अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल झालाय. असा योगायोग तब्बल 59 वर्षांनंतर घडणार आहे.

बृहस्पति स्वतःच्या राशीत मेष राशीत असणार आहे. यावेळी शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्या राशीत असणार आहे आणि सूर्य तूळ राशीत असणार आहे. यासोबतच शनिदेवही जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत आहेत. यामुळे शश राजयोगही तयार होतोय. यासोबतच देवांचा गुरू बृहस्पति आपल्या सप्तम दृष्टीतून सूर्याकडे आहे. 

धनत्रयोदशीत हा योग तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे.

मेष रास (Mesh Zodiac)

गुरू मेष राशीमध्ये आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकतो. नोकरदारांनाही फायदा होणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या कालावधीत तुम्ही ते करू शकता.

मिथुन रास (Mithun Zodiac)

ग्रहांच्या स्थितीनुसार मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि धनलाभ होईल. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे काम पाहून उच्च अधिकारी पदोन्नती किंवा वेतनवाढ देऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता असते. 

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्यासोबतच तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होणार आहेत. व्यवसायातही मोठी रक्कम मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. नोकरदार लोकांचे नशीबही उजळेल. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )