RajBhang Yoga 2023 : शुक्र सूर्याच्या संयोगाने राजभंग योग! या राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता

RajBhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून या महिन्यात सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा योग जुळून आला आहे.     

नेहा चौधरी | Updated: Aug 2, 2023, 01:58 PM IST
RajBhang Yoga 2023 : शुक्र सूर्याच्या संयोगाने राजभंग योग! या राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभाची शक्यता title=
Rajbhang Yoga is formed by Venus and Sun Surya Shukra Yuti 2023 beneficial these zodiac signs astrology

RajBhang Yoga 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली रास बदलतो. या ग्रहांच्या गोचरमुळे काही ग्रह कुंडलीत एकाच घरात एकत्र येतात. त्यातून काही शुभ आणि अशुभ योग तयार होता. जे राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतात. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून या अधिक मासात ग्रहांचा राजा सूर्य आणि संपत्तीचा कारक शुक्र आपली स्थिती बदलणार आहे. शुक्र 7 ऑगस्टला कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासून सूर्यदेव विराजमान आहे. त्यामुळे कर्क राशीत सूर्य आणि शुक्र यांचा संयोगातून राजभंग योग तयार होणार आहे. सूर्य देव कर्क राशीतून 17 ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याचा अर्थ 7 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट म्हणजे एकूण 10 दिवस हा राजभंग योग असणार आहे. या राजभंग योगा फायदा 4 राशींना होणार आहे. 

'या' राशीच्या लोकांना होणार लाभ

मेष (Aries)

या योगामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी कुटुंबासोबत तुम्ही जाऊ शकता. या योगामुळे आर्थिक फायदा होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात यशाचे दरवाजे उघडणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होणार आहे. 

कर्क (Cancer)

या राजभंग योगामुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. अडकलेले तुमचे पैसे परत मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. दुरावलेली माणसं परत तुमच्याकडे येणार आहेत. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवणार आहात. 

तूळ (Libra)

या राजभंग योगामुळे तुमच्या वरील आर्थिक संकट दूर होणार आहे. तुमची रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. तुमच्या परिचयाच्या लोकांकडे जाण्याचा योग येईल. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ लाभदायक असणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठीही राजभंग योग अतिशय चांगला सिद्ध होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. जुने वाद मिटणार आहात. भविष्याबाबत नवीन योजना आखणार आहेत. जे तुम्हाला आर्थिक फायदा करुन देणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)