Navpancham Yog In Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह असून प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशा स्थितीत एखाद्या ग्रहाशी संयोग तयार होतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. येत्या काळात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि देवतांचा गुरू बृहस्पति यांचा संयोग होणार आहे. यामुळे ‘नवपंचम’ योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
हा योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभासोबतच मोठं यश मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार, 1 मे 2024 रोजी दुपारी 1:50 वाजता वृषभ राशीत गोचर होणार आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ 12 जुलै रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशावेळी मंगळ आणि गुरूच्या संयोगामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
या राशीमध्ये द्वितीय घरात नवपंचम योग तयार होणार आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. जमीन आणि मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक आणि प्रेम जीवनाबद्दल बोलल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. यासोबतच मोठ्या नफ्यासह व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पण आणि मेहनतीची प्रशंसा होईल.
या राशीच्या पहिल्या घरात नवपंचम महायोग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळणार आहे. नोकरदार लोकांचा पगार पदोन्नतीने वाढू शकतो. याशिवाय तुमच्या कामाचा विचार करता बोनस मिळण्याची शक्यताही जास्त आहे. नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदच राहणार आहे.
या राशीच्या नवव्या घरात नवपंचम योग तयार होत आहे. तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवून आर्थिक नफा देखील मिळवू शकता. तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. याशिवाय आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये नशीब मिळू शकते. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता पूर्ण होऊ शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)