Vasthu Shastra : स्वप्नात तुम्हाला हा प्राणी दिसतोय का? याचा अर्थ काय असतो?

स्वप्नात जर तुम्हाला हा प्राणी दिसत असेल तर तुम्ही श्रीमंत व्हालं, सांगा तुम्हाला काय दिसलं स्वप्नात 

Updated: Aug 15, 2022, 11:33 PM IST
Vasthu Shastra : स्वप्नात तुम्हाला हा प्राणी दिसतोय का? याचा अर्थ काय असतो?  title=

मुंबई : कधीकधी आपण स्वप्नात खूप विचित्र गोष्टी पाहतो. तर कधी चांगल्या गोष्टी देखील पाहतोच. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नांची दुनिया फार विचित्र असते. स्वप्नशास्त्रात स्वप्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. तुम्ही ऐकले असेल की पहाटेची स्वप्ने शुभ असतात परंतु रात्रीची स्वप्ने देखील काही वेळा फायदेशीर असतात. जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला असेल तर त्या स्वप्नाचा अर्थ काय आहे? जाणून घ्या. 

साप आणि मोर
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात साप आणि मोराचे भांडण पाहत असाल तर अशी स्वप्ने तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. स्वप्न शास्त्रानुसार अशी स्वप्ने दिसणे म्हणजे तुमच्या शत्रूंमध्ये घट होत आहे. जेव्हा अशी स्वप्ने येतात तेव्हा तुमचे शत्रू तुमच्याविरुद्ध रचत असलेले कट फसतील.

शनि महाराज आणि मोर
जर तुम्हालाही स्वप्नात शनि महाराज मोरासोबत दिसले तर असे स्वप्न खूप चांगले मानले जाते. शनि चालिसानुसार असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनलाभ होईल. प्रगतीच्या अनेक संधीही मिळतील.

मोर आणि लांडोर 
जर तुम्ही तुमच्या स्वप्नात मोर आणि लांडोर एकत्र पाहत असाल तर ते अनेक वेळा चांगले परिणाम देते. प्रेमसंबंधांसाठी मोराचं कपल एकत्र पाहणे चांगले मानले जाते. अशी स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध आहेत आणि प्रेमही वाढेल.

पांढरा मोर
जर स्वप्नात पांढऱ्या रंगाचा मोर दिसला तर हे स्वप्न खूप आनंददायी मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्वप्नात पांढरा मोर पाहणे म्हणजे अचानक कुठूनतरी पैसा मिळवणे असा आहे.