Palmistry: भाग्यवान लोकांच्या हातात असते अशी रेषा, रातोरात बनतात कोट्यधीश!

ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्रालाही तितकंच महत्त्वाचं आहे. तळाहातावरील रेषांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करत भविष्याबाबत भाकीत केलं जातात.

Updated: Jun 26, 2022, 12:33 PM IST
Palmistry: भाग्यवान लोकांच्या हातात असते अशी  रेषा, रातोरात बनतात कोट्यधीश! title=

Palmistry Mangal Resha: ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्रालाही तितकंच महत्त्वाचं आहे. तळाहातावरील रेषांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करत भविष्याबाबत भाकीत केलं जातात. तळहातावर काही रेषा अतिशय शुभ, तर काही रेषा अशुभ असतात. तळहातावर अशाच महत्त्वाचा रेषा असतात. या रेषांना मंगळ रेषा आणि भाग्यरेषा म्हटलं जातं. मंगळ रेषा जीवन रेषेला समांतर असते. दुसरीकडे, भाग्यरेषेसोबत मंगळ रेषेचा संयोग खूप शुभ मानला जातो. जाणून घ्या कोणती रेषा कसं फळ देते.

मंगळ रेषा 

  • ज्या लोकांच्या हातात मंगळ रेषा असते त्यांच्या भाग्यातील अनेक दोष दूर होतात. त्यामुळे हस्तरेषाशास्त्रात तळहातावर मंगळ रेषा असणे चांगले मानले जाते.
  • मंगळ रेषेतून एखादी रेषा निघून भाग्यरेषेला स्पर्श करत असेल तर अशा व्यक्तीला खूप लाभ होतो. त्याला आयुष्यात खूप पैसा आणि संपत्ती मिळते.
  • मंगळ रेषा सोडून एक रेषा शनीच्या पर्वतावर जात असेल तर हे अधिक शुभ असते. अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते.
  • मंगळ रेषेतून उगम पावणारी रेषा भाग्यरेषा ओलांडून पुढे गेली तर ती शुभ मानली जात नाही. अशा परिस्थितीत नुकसान होते.
  • मंगळ रेषा ही जीवनरेषेची सहायक रेषा आहे. जर व्यक्तीच्या आयुष्य रेषेत काही दोष असेल आणि हातात मंगळ रेषा असेल तर हे दोष दूर होतात. यासोबतच व्यक्ती चांगले आणि निरोगी आयुष्य जगते.
  • जीवन रेषेत मंगळ रेषा आढळल्यास असे लोक खूप प्रतिभावान असतात. हे लोक सर्व काही अतिशय हुशारीने आणि अचूकपणे करतात. त्यांच्या कामात दोष शोधणे कठीण असते.
  • तळहातातील मंगळ रेषा शुभ स्थितीत असण्यासोबतच मंगळ पर्वत चांगला स्थितीत असेल तर ते खूप चांगले असते. अशा व्यक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. तो सन्मानाने आयुष्य जगतो.
  • जर मंगळाच्या रेषेतून रेषा बाहेर पडून शनि पर्वताकडे जात असेल तर अशा व्यक्तीचे शनिदेवांकडून त्रास होत नाही. या लोकांचे शनि दोष दूर होतात, शनिदेवाच्या साडेसातीत त्यांना कोणतीही समस्या येत नाही. अशा लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळते. हे लोक संपत्तीने श्रीमंत असतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)