Number Prediction: संकोचलेपणा ठरणार भाग्यांक '2' असणाऱ्यांचा शत्रू, तुमच्या आयुष्यात असं कुणी नाही ना?

अशा व्यक्तींबद्दलची महत्त्वाची माहिती... 

Updated: Aug 18, 2022, 11:51 AM IST
Number Prediction: संकोचलेपणा ठरणार भाग्यांक '2' असणाऱ्यांचा शत्रू, तुमच्या आयुष्यात असं कुणी नाही ना?  title=
Number Prediction Mulank 2 People Weakness and streangth

Number Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार अंकज्योतिष शास्त्रातही व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाविषयी भाष्य केलं जातं. अमुक एका व्यक्तिच्या स्वभावगुणांपासून त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्रुटीसुद्धा इथं अधोरेखित केलेल्या असतात. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले आणि काही वाईट गुण असतात. चांगल्या मार्गावर जाणारी प्रत्येक व्यक्ती ओघाओघानं त्यांच्यातल्या वाईट गुणांचा त्याग करते. किंबहुना ती सवय अंगी बाणवते. 

तुम्हाला माहितीये का, भाग्यांक ही एक अशी गोष्ट आहे ज्या माध्यमातून तुमचं भविष्य कळू शकतं. आज आपण ज्यांचा भाग्यांक अथवा मूलांक 2 आहे, अशा व्यक्तींबाबत जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्यातील 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो. 

या आकड्याचे जितके गुण आहेत तितक्याच त्रुटीही आहेत. चला तर मग, जाणून घेऊया 2 या मूलांकाविषयीही अशीच काही माहिती. 

अंक शास्त्रानुसार ज्यांचा भाग्यांक 2 आहे, अशा व्यक्तींचा स्वभाव काहीसा संकुचित असतो. इतरांशी संवाद साधताना ते स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. अनेकदा अपेक्षित वेळेत या व्यक्ती निर्धारित कामं पूर्ण करु शकत नाहीत. ज्यामुळं इतरांच्या नजरेत त्यांची प्रतीमा मलिन होते. 

ही मंडळी भावूक असतात... 
अंकज्योतिषातील माहितीनुसार अशा व्यक्ती अतिशय भावनिक असतात. कल्पनाशक्तीची त्यांना साथ असते. पण, त्यांच्या या गुणाचा चुकीचा फायदा काहीजण घेतात. परिणामी या व्यक्तींनी त्यांच्या संवेदनशील वृत्तीवर नियंत्रण ठेवणं कधीही उत्तम. 

इतरांना समजून घेण्यात कमी पडतात अशा व्यक्ती.... 
2 या आकड्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती इतरांना ओळखण्यात चूक करतात आणि अनावधानाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेद ठेच लागते. त्यामुळं या मंडळींनी माणसं ओळखायला शिकलंच पाहिजे. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )