रक्षाबंधनानंतर राखी बांधत असाल, तर तुम्हाला 'या' गोष्टी माहित असणं गरजे

रक्षाबंधनानंतर जर भावाला वेळेवर राखी मिळाली नाही किंवा कोणत्या ही कारणामुळे भावाला बहिण उशीरा राखी बंधणार असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Updated: Aug 11, 2022, 09:24 PM IST
रक्षाबंधनानंतर राखी बांधत असाल, तर तुम्हाला 'या' गोष्टी माहित असणं गरजे title=

मुंबई : 11 ऑगस्ट 2022 रोजी, गुरुवारी रक्षाबंधन साजरा होत आहे. मात्र, भाद्र कालावधी असल्याने अनेकजण उद्या म्हणजे12 ऑगस्टला हा सण साजरा करणार आहेत. तसेच अनेक लोक आपल्या भावाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला राखी बांधणार आहे. एवढंच काय तर बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे भावाला उशीरा राखी बांधली जाते. तर काही वेळा बहिणी लांब आपल्यामुळे आपल्या भावाला राखी पाठवून देते.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावर राखी बांधतात. हे शक्य नसल्याची परिस्थिती असेल तर बहिण आपल्या भावाला आगाऊ राखी पाठवतात. पण कधी कधी भावाला राखी यायला उशीर होतो आणि रक्षाबंधन संपते.

अशा परिस्थितीत ते रक्षाबंधनानंतर राखी बांधतात. धार्मिक शास्त्रानुसार जन्माष्टमीपर्यंत राखी बांधता येते. त्यामुळे राखी उशीरा बांधली गेली तरी चालते.

खरंतर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून भावाला राखी बांधली जाते. पण काही वेळा राखी वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत रक्षाबंधनानंतर जर भावाला वेळेवर राखी मिळाली नाही किंवा कोणत्या ही कारणामुळे भावाला बहिण उशीरा राखी बंधणार असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

- बहिणीने पाठवलेली राखी मुलगी, बहिणीला किंवा आत्याने बांधवी. जे लोक बहिणीच्या वतीने राखी बांधतील त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि त्यांना नक्कीच काहीतरी भेट द्या. याशिवाय कोणत्याही पंडिताकडून देखील तुम्ही ती राखी बांधून घेऊ शकता.

- राखी उशिरा मिळाली तरी ती योग्य वेळ पाहून बांधा. राहूकाळात कधीही राखी बांधू नका. असं करणं अशुभ आहे.

- पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदा तिथीला राखी बांधू नका. असे करणे चांगले मानले जात नाही. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी राखी बांधणे चांगले.

- पंचक काळातही राखी बांधू नये. पंचक काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे अशावेळी राखी बांधणेही टाळावे.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)