Shani Gochar 2024: नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता अवघा एक महिना बाकी आहे. काही दिवसांनी नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, 2024 मध्ये अनेक ग्रह त्यांच्या हालचाली बदलतील. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देवांच्या हालचालीला महत्त्व दिलं जातं.
ग्रहांच्या या बदलामध्ये शनिदेवाचाही सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. येत्या नवीन वर्षात शनी देव देखील त्यांच्या हालचालीत बदल करणार आहेत. शनीचं हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे.
2024 मध्ये, शनी कुंभ राशीत असताना वक्री आणि मार्गी होणार आहेत. शनिदेव 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या वक्री अवस्थेत असणर आहेत. तर 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 पर्यंत अस्त होणार असून शनिदेव 18 मार्च 2024 रोजी उदयास येणार आहेत.
शनीच्या देवाच्या हालचालीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर होणार परिणाम
मेष राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीच्या स्थितीत होणाऱ्या बदलामुळे खूप फायदा होणार आहे. या काळात मेष राशीला विशेष आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही बऱ्यापैकी प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनाही शनिदेवाच्या कृपेने पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. मेष राशीसाठी शनीचे गोचर शुभ राहणर आहे. या लोकांना विविध क्षेत्रात यश आणि प्रगती मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2024 खूप चांगले असणार आहे. ज्यावेळी शनिदेव वक्री अवस्थेत येतील तेव्हा सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षेतील अडथळे कायमचे दूर होणार आहेत.
2024 मध्ये मकर राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबाच्या आनंदात वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यवसायात वाढ होऊन आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात चांगली बातमी मिळू शकते. तज्ञांच्या सल्ल्याने शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. नोकरीत मोठा बदल होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )