Career Money Horoscope 2023: नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नव्या वर्षासाठी नवे संकल्प देखील केले आहेत. नवीन वर्षाचे आखाडे बांधत असताना ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. 2023 या वर्षात (New Year 2023) ग्रहांची स्थिती पाहता तीन राशींसाठी (Zodiac) येतं वर्ष चांगलं ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात आर्थिकदृष्ट्या फायदा दर्शवत आहे. या काळात जातकांना उच्च पदस्थ नोकरी मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींसाठी 2023 हे वर्ष लकी ठरणार.
मिथुन (Mithun)- या राशींसाठी 2023 हे वर्ष खूप लाभदायी ठरणार आहे. शनिदेवांच्या अडीचकीतूनही मुक्तता होणार आहे. त्यामुळे हातात घेतलेली कामं देखील पूर्ण होणार आहेत. या काळात प्रमोशन इंक्रीमेंट मिळेल. उच्च पद मिळाल्याने आनंद होईल. या काळ लग्नासाठी अनुकूल आहे. जोडीदार देखील मनासारखा मिळेल. एकंदरीत 2023 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे.
तूळ (Tula)- मिथुन राशींप्रमाणेच तूळ राशीची शनिच्या अडीचकीतून मुक्तता होणार आहे. 2022 या वर्षात तूळ राशीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आता येणारं वर्ष अडचणी दूर करणारं असेल. या काळात हातात घेतलेली कामं पूर्ण होतील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. पैसे कमवण्याचे नवनवे स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
Astrology: 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या
वृश्चिक (Vrushchik)- या राशीला येतं वर्ष चांगलं असणार आहे. कामात व्यस्त असणारा काळ असला तरी करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. या संधीचा फायदा घेण्याची ही वेळ आहे. या काळात प्रमोशन आणि पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगलं फळ मिळेल. स्वप्न सत्यात उतरतील अशी ग्रहांची स्थिती आहे. सिंगल असलेल्यांना या काळात पार्टनर मिळू शकतो. कौटुंबिक पातळीवर सर्व वाद शांत झालेले असतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)