Neptune Grah Gochar 2022: नेपच्यून ग्रह हा स्वप्नांचा आणि मायावी प्रभाव असलेला ग्रह आहे. नेपच्यून ग्रहाला वरूण ग्रह म्हणून संबोधलं जातं. राशींमध्ये बृहस्पतिसह मीन राशीचे प्रभुत्व सामायिक करते. हा ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा दुवा मानला जातो. मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून, व्यक्तीच्या अवचेतन संबंधांबद्दल माहिती देते. हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. 14 वर्षांनंतर म्हणजेच 11 सप्टेंबर 2022 रोजी वरुण ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दिवशी दुपारी 03 वाजून 11 मिनिटांनी वरुण ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार वरुण ग्रहाला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी 14 वर्षे लागतात आणि त्यामुळे त्याचे राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 164 वर्षे लागतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या स्थानात वरुण ग्रह असतो, त्या स्थानामध्ये त्या व्यक्तीला संबंधित चमत्काराची अनुभूती मिळते. कुंभ राशीतील वरुण ग्रहाचा राश बदल अनेक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे आहे. काही राशीच्या लोकांना हा काळ भरभराटीचा ठरेल. चला जाणून घेऊया वरुण ग्रहाचा गोचर कोणत्या राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे.
वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ असेल. कुंभ राशीतील वरुण ग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या दरम्यान, काही नवीन लोक भेटू शकतात, त्यांचा भविष्यात फायदा मिळेल. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना या काळात भरपूर यश मिळेल.
कुंभ- या राशीच्या लोकांसाठी गोचर फलदायी असणार आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही या काळात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही नोकरीसोबत व्यवसायही सुरू करू शकता.
कन्या- या काळात कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ होईल. या काळात लोकप्रियतेत वाढ होईल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल.
कर्क- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत राहील. व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल. दुसरीकडे, जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर हे स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
मकर- वरुण ग्रहाचा गोचर या राशीच्या लोकांसाठी विशेषतः फलदायी ठरेल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. एवढेच नाही तर या गोचरामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या गोचरामुळे प्रवासाचे योग तयार होत आहेत. प्रत्येक ठिकाणी आदर आणि सन्मान मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)