Mangal Grah Gochar In Vrushabh Rashi: ग्रहांचं गोचर ज्योतिषशास्त्रात महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक आहे. ग्रहांच्या गोचरामुळे शुभ-अशुभ परिणाम होत असतात. त्यामुळे एखाद्या ग्रहाने राशी बदल केला की, लगेचच भाकीत केलं जातं. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. 10 ऑगस्टला मंगळ ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. मंगळ एका राशीत जास्तीत जास्त 45 दिवस राहतो. मात्र वृषभ राशीत 68 दिवस वास्तव्य करणार आहे. यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसणार आहे. खासकरून 7 राशींना शुभ परिणाम मिळतील.
वृषभ: मंगळ ग्रह राशीच्या लग्न भावात गोचर करत आहे. या कालावधीत तुम्हाला संपत्ती खरेदी करण्याचा चांगला योग आहे. पण पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. तसेच लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल.
कर्क: आपल्या राशीच्या अकराव्या स्थानात मंगळ गोचर करत आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकतो. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.
सिंह: या राशीच्या दहाव्या स्थानात मंगळ ग्रह गोचर करत आहे. त्यामुळे तुमच्या व्यापार विस्तार होण्यास अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली ठरेल. तसेच धनप्राप्तीचा योग आहे.
कन्या: कन्या राशीच्या नवव्या राशीत मंगळ 68 दिवस वास्तव्य करणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आईकडून चांगलं सहकार्य मिळेल.
धनु: सहाव्या स्थानात मंगळ गोचर लाभदायी ठरेल. या काळात शत्रूंवर मात मिळवाल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळतील.
मकर: मकर राशीच्या पंचम स्थानात मंगळ गोचर करत आहे. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. या दरम्यानं नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.
मीन: मीन राशीच्या तिसऱ्या स्थानात मंगळ गोचर लाभदायी ठरू शकतो. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम काळ आहे.