Navratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा

जाणून घेऊया दसऱ्यापर्यंत नेमकी कोणत्या दिवशी तुम्ही ही लाखामोलाची खरेदी करु शकता...   

Updated: Sep 28, 2022, 07:16 AM IST
Navratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा  title=
Navratri 2022 Auspicious yog for ne purchase of vehicle and property

Navratri 2022 : नवरात्रोत्सवाचे सर्वच दिवस अतिशय शुभ असतात. पण, यावर्षीची नवरात्र अधिक खास आहे. कारण, यावर्षी बरेच शुभ योग होत आहेत. त्यामुळं तुम्ही एखादी प्रॉपर्टी किंवा एखादं वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर हा काळ उत्तम आहे असं समजा. नक्षत्रांची स्थिती पाहता हा काळ फलदायी आहे. त्यामुळं आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात तुम्ही करु शकता. चला तर मग जाणून घेऊया दसऱ्यापर्यंत नेमकी कोणत्या दिवशी तुम्ही ही लाखामोलाची खरेदी करु शकता... (Navratri Auspicious yog for ne purchase of vehicle and property)

28 सप्टेंबर- हा नवरात्रीमधील (Navratri 2022) तिसरा स्वाती आणि सुस्थिर योग आहे. या योगादरम्यान तुम्ही जी कोणती गोष्ट खरेदी कराल ती तुम्हाला दीर्घकाळासाठी सुख देणार आहे. 

29 सप्टेंबर- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सौभाग्य आणि सिद्धी योग आहे. 

30 सप्टेंबर - हा नवरात्रीचा पाचवा दिवस. या दिवशी विशाखा नक्षत्र आणि प्रिती योग आहे. 

अधिक वाचा : Navratri 2022 : नवरात्रीत ओढवून घ्याल गरीबी..देवीला चुकूनही अर्पण नका करू या गोष्टी..

1 ऑक्टोबर- नवरात्रीच्या या सहाव्या दिवशी आयुष्मान आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव आहे. या दिवशी घेतलेली संपत्ती तुम्हाला लाभदायी ठरेल. 

2 ऑक्टोबर- सप्तमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, सिद्धी आणि शोभन योग आहेत. त्यामुळं हे दिवसही चांगले आहेत. 

5 ऑक्टोबर- दशमीच्या दिवशी श्रावण नामक शुभ योग तयार होत आहे. सोबतच सुकर्मा आणि छत्र नावाचे योगही तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ करतील.