Navpancham Yog 2023 : ज्योतिष्य शास्त्रामध्ये अनेक शुभ आणि अशुभ योग होत असतात. ग्रह-नक्षत्रांच्या संक्रमणामुळे हे योग तयार होतात. 1 जुलै 2023 रोजी मंगळ ग्रहाने गोचर केलंय. यावेळी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे देवगुरू बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या एकत्रिक येण्याने एक खास योग जुळून आला आहे.
मंगल आणि गुरु यांनी मिळून नवपंचम योग तयार केला आहे. नवपंचम योग हा काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. नवपंचम योग 4 राशींच्या लोकांना अपार संपत्ती देणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
मेष राशीच्या लोकांना नवपंचम योग शुभ परिणाम देणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असून नवपंचम योग मंगळ व गुरू मिळून तयार होतोय. या योगामुळे संपत्ती आणि मान-सन्मान वाढणार आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करू शकतात.
कर्क रास
नवपंचम योग कर्क राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ देणार आहे. अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याची अपेक्षा करू शकता. उत्पन्नात वाढ होणार आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. पैसे वाचवण्याचे तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील.
सिंह रास
गुरु-मंगळ यांनी तयार केलेला नवपंचम योग सिंह राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. तुमच्या जुन्या समस्या संपुष्टात येणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नवीन पार्टनर मिळू शकतो. रखडलेली कामं पूर्ण होतील. अध्यात्मात रुची वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि निर्यात-आयात यांच्यामध्ये लोकांना यश मिळेल.
तूळ रास
नवपंचम योग तयार झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत. करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. जीवनसाथीकडून पैसे मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. अविवाहित लोकांचे नाते पक्के होऊ शकते. पदोन्नतीच्या मिळण्याच्या संधी आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )