September Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! 'या' दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील?

Monthly September Horoscope 2023 : सप्टेंबर महिन्यात काही राशींसाठी अतिशय शुभ तर काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी कसा असेल सप्टेंबर महिना.

नेहा चौधरी | Updated: Sep 1, 2023, 07:20 AM IST
September Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! 'या' दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील? title=
monthly horoscope September 2023 masik rashifal September all zodiac signs astrology news in marathi

September Horoscope 2023, September Masik Rashifal :  सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच संपत्तीचा कारक शुक्र आणि गुरु राशी गोचर करणार आहे. त्यासोबत अजून तीन ग्रह संक्रमण करणार आहे. अशातच काही राशींसाठी सप्टेंबर महिन्या काहींसाठी अतिशय शुभ तर काहींसाठी अचडणीचा असणार आहे. सप्टेंबर महिना (Monthly Horoscope in Marathi) तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.  (monthly horoscope September 2023 masik rashifal September all zodiac signs astrology news in marathi)

मेष (September 2023 Aries horoscope) 

मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय उत्तम असणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली लागण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदीचं योग आहे. त्याशिवाय मित्र, नातेवाईकांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिन्यात यश घेऊन आला आहे. तिसरा आठवड्यात वादावादी किंवा भांडणं होण्याची भीती आहे. यातून मार्ग निघेल. या महिन्यातील 20 आणि 21 तारखेला काळजी घ्या. 

वृषभ (September 2023 Taurus horoscope) 

या राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना यश घेऊन आला आहे. सौम्य स्वभाव आणि उर्जेच्या जोरावर तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं आणि कामाचं कौतुक होणार आहे. त्याशिवाय समाजात तुमची प्रतिष्ठा या महिन्यात वाढणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. या महिन्यात प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. मौलवान वस्तू जपून ठेवा. घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. नवीन लोकांशी ओळखी वाढणार आहे. मात्र या महिन्यात  13 आणि 14 तारखेला सतर्क राहा. 

मिथुन (September 2023 Gemini horoscope)

या राशींसाठी सप्टेंबर महिना आर्थिकृष्ट्या चांगला असणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. तुमच्या स्वभाव आणि बोलण्याचा कौशल्याने तुम्ही कठीण प्रसंगांवर मात करणार आहात. आरोग्याबाबत या महिन्यात काळजी घ्या. खास करु डोळ्याची निगा राखा. कुटुंबात विभक्ततेची परिस्थिती येऊ शकते. कामाच्या ठिकाणीही काळजी घ्या. षड्यंत्रापासून दूर राहा. उगाचच तुमचा अपमान करण्यासाठी लोक आतुर असतील. महिन्याच्या 25 आणि 26 तारखेला सतर्क राहा. 

कर्क (September 2023 Cancer horoscope) 

कर्क राशीसाठी हा महिन्या आव्हानात्मक असणार आहे. तिसऱ्या आठवड्यातील ग्रह बदलामुळे तुमच्या नशिबात आर्थिक फायदा लिहिलेला आहे. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम किंवा व्यवसायात या महिन्यात तुम्हाला यश मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येतील. घर खरेदीचे योग या महिन्यात जुळून आले आहेत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या 18 आणि 19 तारखेला सावधान राहा. 

सिंह (September 2023 Leo horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय उत्तम असणार आहे. हा महिना यश आणि प्रगती घेऊन आला आहे. मोठे करार होणार आहेत. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा तर हा काळ तुमच्यासाठी योग आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडून पूर्ण होणार आहे. नवी जोडप्यांसाठी हा काळ चांगला आणि आनंदी असणार आहे. मात्र लव्ह लाइफ उदास राहील. स्पर्धेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. महिन्याच्या 29 आणि 30 तारखेला सतर्क राहा. 

कन्या (September 2023 Virgo horoscope) 

या राशींसाठी सप्टेंबर महिना तणावाचा असणार आहे. कार्यक्षेत्रात यश मिळाल्यामुळे ऑफिसमधील वातावरण आनंदी असेल. मात्र घरात कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वस्थतेचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. परदेशात प्रवासाचे योग आहेत. तर परदेशीतील एखादा मित्र किंवा नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. या महिन्यात तुमच्या कामाच्या योजना या गुपीत ठेवा. त्यात यश मिळेपर्यंत कोणालाही सांगू नका. महिन्याच्या 27 आणि 28 तारखेला विशेष काळजी घ्या. 

तूळ (September 2023 Libra horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना आनंद घेऊन येणार आहे. तुम्हाला या महिन्यात अनेक अनपेक्षित चांगल्या बातम्या मिळणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागातील रखडलेली कामं या महिन्यात मार्गी लागणार आहे. मुलांची जबाबदारी तुम्ही योगरित्या सांभाळणार आहात. नवविवाहित जोडप्याकडून गोड बातमी मिळणार आहे. दुसरीकडे कुटुंबात वादावादी होण्याची शक्यता आहे. या महिन्यातील 06 आणि 07 ला काळजी घ्या. 

वृश्चिक (September 2023 Scorpio horoscope)

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना कधी खुशी कधी गम असा असणार आहे. या महिन्यात तुम्हाला मानसिक तणाव वाटणार आहे. तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार असाल तर हा महिन्या योग असेल. सरकारी खात्यांमध्ये टेंडर्स वगैरेसाठी हा महिना योग असेल. तुमच्या कामात शासकीय विभागाचे योग सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. जमीन किंवा मालमत्ता खरेदीचे सुवर्ण योग आहेत. या महिन्यातील 09 आणि 10 तारखेला सावध राहा. 

धनु (September 2023 Sagittarius horoscope)

या राशीच्या लोकांसाठी संपूर्ण महिना यश आणि प्रगतीचा महिना असणार आहे. शैक्षणिक स्पर्धेत तुम्हाला अभूतपूर्व यश प्राप्त होणार आहे. मुलांशी संबंधित समस्यावर तुम्ही मार्ग शोधण्यात यशस्वी होणार आहात. परदेशात शिक्षणांसाठी जाणाऱ्यांची इच्छा या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहित जीवनात गोडवा असणार आहे. सासरच्या मंडळीकडून तुम्हाला लाभ होणार आहे. या महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला सतर्क राहा. 

मकर (September 2023 Capricorn horoscope)

या राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराचा असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही विस्तार करणार आहात. कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. पण दुसरीकडे कुटुंबात मात्र कलह आणि मानसिक अशांतता असणार आहे. न्यायलयाशी संबंधित वाद तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. गुप्त शत्रूंपासून कटकारस्थान रचणार आहेत त्यामुळे सावध राहा. सामाजिक पद प्रतिष्ठा वाढणार आहे. मोठे बक्षीसही जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या 29 आणि 30 तारखेला काळजी घ्यावी.

कुंभ (September 2023 Aquarius horoscope) 

या राशीसाठी सप्टेंबर महिना अतिशय फायदेशीर आहे. तुमची रखडलेली कामं सहज मार्गी लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवरही तुम्ही योगरित्या नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होणार आहात. कुटुंबात विभक्तचेची परिस्थिती निर्माण होणार आहे. धर्म आणि अध्यात्माकडे तुमचा कल वाढणार आहे. धार्मिक ट्रस्ट आणि अनाथाश्रम तुमचं सहभाग वाढणार आहे. जी लोक तुमच्या विरोधात आहेत, तुम्ही त्यांनाही मदत करणार आहात. मात्र या महिन्यात गुप्त शत्रूंपासून सावध राहा. या महिन्यातील 16 आणि 17 तारखेला सतर्क राहा. 

मीन (September 2023 Pisces horoscope)

या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात मानसिक त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. आरोग्याकडे विशेष काळजी घ्या वैवाहिक जीवनातही वादळ येणार आहे. सासरच्या बाजूनेही मतभेद होणार आहेत. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतेही मोठे कामं तुमच्या हिताचे असणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमधील कामात तुम्हाला यश मिळणार आहे. या महिन्याच्या 18 आणि 19 तारखेला सावध राहा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)