Five Rupee Coin Upay : प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा. त्या पैशातून जीवनातील सर्व सुखसोयी आणि आनंद त्यांना अनुभवता येतील. आलिशान घर, खूप सारं शॉपिंग, परदेशात फिरायला जाणं असे अनेकांची स्वप्न असतात. सगळ्यांना वाटतं आपलं कुटुंब सुखी राहवं, त्यांना कुठल्याही गोष्टींची कमतरता जाणून नये असं वाटतं. पण अपार कष्ट करुनही पैसा मिळत नाही, आर्थिक तंगी जाणवते. अशात ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. एक 5 रुपयांचं नाणं तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं. (money Tips 5 rupee coin will make you rich Do only this upay astrology in marathi news)
ज्योतिष शास्त्रामध्ये 5 रुपयांच्या नाण्याबाबत काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने व्यक्तीचं उत्पन्न निश्चितच वाढले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. यासोबतच व्यक्तीची आर्थिक स्थितीही मजबूत होते. हा उपाय केल्याने व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते आणि व्यक्तीला लगेच शुभ फळ प्राप्त होतात.
ज्योतिषशास्त्रात 5 रुपयांच्या नाण्याला खूप चमत्कारिक उपाय सांगितले आहेत. यासाठी पूजागृहाजवळ अक्षत किंवा दुर्वाने भरलेला कलश ठेवावा. या कलशात 5 रुपयांचं नाणं ठेवा. यानंतर या कलशाची नियमित पूजा केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. एवढंच नाही तर माणसाचं नशीब देखील पालटतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
दुसरा उपाय असा आहे की, 5 रुपयांचं नाणं घ्या आणि त्यावर सिंदूराने तुमच्या नावाचं पहिलं अक्षर लिहा. हे नाणे घराच्या छतावर किंवा पाण्याच्या टाकीवर ठेवा. हे 5 रुपयाचं नाणं रात्रभर तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजाघरात ठेवा. यानंतर माँ लक्ष्मीचं आवाहन करताना लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. आता हे लाल रंगाचं बंडल तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)