Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 20, 2023, 08:54 AM IST
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश? title=
Mars Transit in Leo mangal gochar 2023 will shine luck like surya give immense wealth

Mangal rashi parivartan 2023 : धैर्य, शौर्य, पराक्रम, जमीन आणि लग्नाचा कारक मंगळ लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. हा ग्रहांचा सेनापती रक्ताचा कारकही मानला जातो. सध्या तो कर्क राशीत आहे. (Mars Transit in Leo) जेव्हा मंगळ सूर्याच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा या गोचरमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो.  वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहांची स्थिती ही शुभ आणि अशुभ योग घेऊन येते. 

 1 जुलैला मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार असून तो 17 ऑगस्ट या राशीत विराजमान राहणार आहे. मंगळ गोचरमुळे वृषभ, कन्या आणि मकर या तीन राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. तर तीन राशींवर मंगळ गोचरमुळे अच्छे दिन येणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. (Mars Transit in Leo mangal gochar 2023 will shine luck like surya give immense wealth )

सिंह (Leo)

मंगळ हा सिंह राशीतील चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे मंगळ गोचरमुळे या राशीचे नशिब पालटणार आहे. हातातील काम उत्साहीने आणि यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. जमीन, वास्तू आणि आर्थिकबाबत फायदा होणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. 

धनु (Sagittarius)

मंगळ गोचरमुळे या राशीच्या लोकांचे अच्छे दिन असणार आहे. धनु राशीच्या नवव्या घरात मंगळ विराजमान राहणार आहे. त्यामुळे या काळात भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. अडकलेली कामं सहज मार्गी लागणार आहेत. घरात शुभ कार्य ठरणार आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 

वृश्चिक (Scorpio)

 मंगळ गोचर वृश्चिक राशीसाठीही खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश संपादन करता येणार आहे. प्रगती आणि आर्थिक बाबत हा काळ या राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. व्यावसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी चालून येणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)