Mangal-Shukra Yuti : ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांची राशी बदलतात. ग्रहांच्या गोचरबरोबरच ग्रहांची होणारी युती देखील खूप महत्वाची मानली आहे. या ग्रहांच्या युतीचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, 1 जुलै रोजी मंगळ देव सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान दुसरीकडे, सुख आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 7 जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहे. सिंह राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांच्या युतीचा सर्व राशींवर खास प्रभाव पडणार आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा शौर्य, शौर्य तसंच क्रोधाचा कारक मानला जातो. तर शुक्र हा विलास, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. या दोघांच्या युतीचा काही राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
शुक्र आणि मंगळाच्या युतीने शुभ काळ सुरू होऊ शकतो. या काळात तुम्हाला नवीन नोकरी किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नवीन जोडीदार मिळू शकतो. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्याही संपुष्टात येणार आहे. तुमच्या जोडीदाराचीही यावेळी चांगली प्रगती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.
या दोन्ही ग्रहांची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या दोन ग्रहांची उपस्थिती तुमच्यासाठी शुभ आहे. या काळात उत्पन्नाची नवीन साधनं निर्माण होऊ शकतात. तसंच तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. करिअरच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय फलदायी ठरू शकतात. मालमत्ता, जमीन यांच्या खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्राची युती शुभ ठरू शकणार आहे. ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या घरात होणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकणार आहे. तसंच तुमचा व्यवसाय दिवसा दुप्पट वाढेल. नवीन लोकांशी तुमचे संपर्क जोडले जातील. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )