Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन

Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात.  7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.

Updated: Jul 2, 2023, 08:29 PM IST
Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन title=

Mangal Shukra Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात. नुकतंच मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. याशिवाय 7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे. मंगळ आणि शुक्र यांचं एकत्र येणं काही राशींसाठी शुभ ठरणार आहेत. या राशी कोणत्या आहेत, ते पाहुयात. 

वृषभ रास

या काळात नशीब वृषभ राशीच्या लोकांचं नशीब खुलणार आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे. मंगळ-शुक्र यांच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्यास मदत होणार आहे. योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला मोठे फायदे होणार आहेत. आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. व्यवसायात योग्य व्यवहार करण्याची वेळ आहे. तुमच्या आवडत्या स्थळी प्रवास कराल. व्यवसायिकांना दिलेले पैसे परत मिळू शक्यता आहे. 

सिंह रास

मंगळ-शुक्र युतीमुळे तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे. या काळात साहसी कृत्ये करण्यासाठी योग्य वेळ मानली जातेय. जुनी गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रतिष्ठा मिळू शकते. मित्र आणि कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी प्रवास करू शकता. या काळामध्ये तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 

धनू रास

मंगळ-शुक्र राशीची युती धनू राशीच्या लोकांच्या भाग्यावर परिणाम करणार आहे. अध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. या काळात तुम्हाला पदोन्नतीची शक्यता जास्त आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी पगारात वाढ होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत व्यवसायात नफा मिळविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे. प्रलंबित कामं वेळेवर पूर्ण करावी लागणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )