मकर संक्रांतीला तुमच्या राशीनुसार दान करा या वस्तू, भाग्य बदलण्याचे संकेत

मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान कराव्या पाहुया. 

Updated: Jan 12, 2022, 07:55 PM IST
मकर संक्रांतीला तुमच्या राशीनुसार दान करा या वस्तू, भाग्य बदलण्याचे संकेत title=

मुंबई : नवं वर्ष काही राशींसाठी खूप भाग्याचं तर काही राशीच्या व्यक्तींना अडचणीचं जाणार आहे. मात्र मकर संक्रांतीला तुमचं भाग्य बदलण्याचे संकेत आहेत. आपल्याकडे फार पूर्वीपासून असं सांगितलं जातं की आपल्यातलं थोडं दान करावं. दान केल्यानं पुण्य वाढतं. अर्थात आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभतात. 

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कोणत्या राशीनं काय दान केलं तर त्याचा कसा फायदा होणार याबाबत आज जाणून घेणार आहोत. या दिवशी राशीनुसार विशेष वस्तूंचे दान केल्याने विशेष लाभ होतो. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान कराव्या पाहुया. 

मेष :  या राशीच्या लोकांनी तांब्याची भांडी, गूळ, तीळ किंवा दही दान करावे
वृषभ: मकर संक्रांतीला या राशीच्या लोकांनी चांदीच्या वस्तू किंवा तीळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील.
मिथुन: शुभ मुहूर्तावर स्नान केल्यानंतर गुळ आणि पिवळ्या वस्तूंचे दान केल्यास शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. 
कर्क : संक्रांतीला या राशीच्या लोकांनी पांढरे तीळ दान करणे फायद्याचं ठरू शकतं.
सिंह: या राशीच्या लोकांनी गहू आणि गुळाचे दान करावे.
कन्या: कन्या राशीच्या लोकांना तीळ आणि हिरवा मूग दान करणे लाभदायी ठरणार आहे. 
तुळ: मकर संक्रांतीच्या दिवशी सात प्रकारच्या धान्यांचे दान करणे खूप शुभ असणार आहे. याशिवाय तुम्ही गुळाचे दानही करू शकता.
वृश्चिक : वृमकर संक्रांतीला लाल रंगाचे कपडे दान करावे. तसेच दही दान करणे शुभ राहील.
धनु : मकर संक्रांतीला पिवळे वस्त्र दान करावे. खिचडी दान केल्याने फायदा होईल.
मकर: काळे तीळ आणि काळ्या रंगाची घोंगडी मकर राशीच्या लोकांना दान करणे शुभ
कुंभ : शुद्ध गायीच्या तुपाचे दान करावे. याशिवाय खिचडी दान केल्यानं फायदा होईल. 
मीन: हरभरा मसूर आणि तीळ दान करावं त्याचा फायदा या राशीच्या लोकांना होणार आहे. 

(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)