महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?

तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 13, 2018, 08:58 AM IST
महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय? title=

मुंबई : तुम्ही जर शिवभक्त असाल तर, तुमच्या मनात भगवान शिवशंकराच्या एका छबीचा सातत्याने निवास दिसेल. ती छबी असते एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू, गळ्यात साप, कपाळाला चंदन आणि डोक्यावर भरपूर वाढलेला केशंभार. जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला या गोष्टी दिसतीलच दिसतील. यापैकी लक्ष्यवेधी ठरते ते त्रिशूळ आणि डमरू. तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?

त्रिशूळ आणि धनूष्य भगवान शंकराची दोन अस्त्रे

भगवान शंकराच्या त्रिशूळाबाबत अनेक पुराणकथा, अख्यायिका, दंतकथा सांगितल्या जातात. त्यात विविध उल्लेख आढळताता. सांगितले जाते की, भगवान शंकराची दोन अस्त्रे आहेत. त्यापैकी एक आहे धनुष्य आणि दुसरे आहे त्रिशूळ. धनुष्याची निर्मिती स्वत: शंकरांनी केली आहे. पण, त्रिशूळ कोठून आले याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पुराणकथेनुसार जेव्हा सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा ब्रम्हनादातून शिव प्रकट झाले. या प्रकटीकरणासोबत रज, तम आणि सत हे तीन गुणही प्रकट झाले. या तीन गूणांतूनच त्रिशूळ जन्माला आले, या तीन गुणांशिवाय सामंजस्य बनविने आणि शांतपणे संचलन करणे कठीण होते. म्हणूनच भगवान शिवशंकरांनी आपल्या हातत त्रिशूल धारण केले, असे सांगतात.

शंकराच्या हाता डमरू कसे?

भगवान शंकराच्या हातत असलेल्या डमरूबद्धलही विशेष कहाणी आहे. सांगितले जाते की, सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा देवी सरस्वती प्रकट झाली. तव्हा देवीने आपल्या वीणेचे स्वराने सृष्टीत ध्वनी निर्माण झाला. मात्र, हा ध्वनी सूर आणि संगीत विरहीत होता. त्या वेळी भगवान शिवने नृत्य करत चौदा वेळा डमरू वाजवले. त्यातून निर्माण झालेल्या ध्वनीतूीन व्याकरण आणि संगीताचे सूर, ताल जन्माला आले. सांगितले जाते की, शंकराच्या हातातील डमरू हे ब्रम्हाचे रूप आहे. जो दूरून पाहता अत्यंत महाकाय असे दिसते. परंतू, जसजसे आपण ब्रम्हाच्या जवळ जातो तसतस तो अत्यंत संकुचित होत जातो आणि ठरावीक कालावधीनंतर पुन्हा विस्तृत आकार धारण करतो. सृष्टीत संतूलन प्राप्त करण्यासाठी भगवान शिवने डमरूही सोबत आणले होते.