मेष - चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सहनशक्तीने काम केल्यास कोणत्याही अडचणींशिवाय कामं पूर्ण होतील. खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या.
वृषभ - प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. गुप्त प्रशंसकांची मदत होईल. जोडीदारासाठी खरेदी करु शकता. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य मिळेल.
मिथुन - जीवनाप्रती एक नवा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो. मागच्या गोष्टी विसरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. दिवस चांगला आहे.
कर्क - आजू-बाजूच्या लोकांशी चांगला ताळमेळ राहील. कोणावरही अवलंबून राहू नका. समजूतीने काम करा. उत्साही वाटेल.
सिंह - कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणामुळे चीडचीड होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. इतरांना प्रभावित कराल. जोडीदारांच्या भावना समजून घ्या.
कन्या - कामाची रुपरेषा आखल्यास कामं पूर्ण होण्यास मदत होईल. कामात गती मिळेल. आत्मविश्वास डळमळू देऊ नका. स्वत:साठी वेळ काढा. आरोग्य सुधारेल.
तुळ - दिवस चांगला आहे. तब्येत चागंली राहील. कोणतीही संधी सोडू नका. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. जेवण वेळेत करा.
वृश्चिक - नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरीत याचा फायदा होऊ शकतो. सहकाऱ्यांची मदत होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील.
धनु - काही निर्णय घेताना त्रास होऊ शकतो. समस्या निर्माण होऊ शकतात. कामं पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नका.
मकर - नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. बोलताना विचार करुन बोला. कामात घाई करु नका.
कुंभ - जुन्या वादांवर मार्ग निघू शकतो. परिस्थितीशी मिळतं-जुळतं घ्याल. नवीन लोकांच्या भेटी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल.
मीन - प्रेमसंबंधांमध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. थकवा जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या. सकारात्मक राहा.