आजचे राशिभविष्य | रविवार | २२ डिसेंबर २०१९

कसा आहे तुमचा आजचा दिवस?  

Updated: Dec 22, 2019, 01:25 PM IST
आजचे राशिभविष्य | रविवार | २२ डिसेंबर २०१९ title=

मेष - मनातील गोष्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकता. मित्र, कुटुंब, नातेसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. इतरांशी बोलण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्या. 

वृषभ - तणाव जाणवू शकतो. परंतु चिंता करु नका. ताण अधिक काळ राहणार नाही. आराम करा. शांततेत दिवस जाईल. 

मिथुन - आजचा दिवस चांगला आहे. कामातून स्वत:ला वेळ द्या. बाहेर जाऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या. स्वत:वर लक्षकेंद्रित करा.

कर्क - मित्र, कुटुंबियांची भेट होईल. इतरांच्या भावनांचा विचार करा. तुमच्या भावनांचा सन्मान होईल. उत्साही राहाल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामं पूर्ण होतील. काही नवे अनुभव मिळतील. जोडीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल. 

कन्या - सकारात्मक विचार करा. तुमच्या मतांवर ठाम राहा. छोट्या गोष्टींचा अधिक विचार करु नका. पुढे जाण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवा.

तुळ - आनंदी राहाल. तुमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला फायद्याचा ठरु शकतो. जोडीदाराशी मनातील गोष्टी शेअर करु शकता.

वृश्चिक - काही चागंले बदल होऊ शकतात. आराम करा. अन्यथा त्रास होऊ शकतो. प्रिय व्यक्तींसोबत बाहेर जाण्याच्या योजना आखू शकता. 

धनु - उत्साही राहाल. एखादी शुभवार्ता कानी येऊ शकते. कुटुंबासोबत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा कराल. चर्चेतूनच समस्येवर मार्ग निघू शकतो.

मकर - कामात घाई करु नका. काही बाबींमध्ये इतरांसोबत असहमती असल्याने समस्या होऊ शकते. निराश होऊ नका. इतरांच्या भांडणात पडू नका. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - कामात  पूर्णपणे मन लागणार नाही. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी, ताण वाढू शकतो. कुटुंबासोबत शुभकार्यात सहभागी व्हाल. मोठ्या भावंडांची मदत होईल.

मीन - तुमच्या मनातील गोष्टी प्रियजनांसोबत शेअर करु शकता. उत्साही वाटेल. तब्येतीकडे लक्ष द्या. मित्र, कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल.