Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ

Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत. 

Updated: Dec 2, 2022, 06:59 AM IST
Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ  title=
know the meaning of Women Related Dreams

Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तर, ती स्वप्नांमधील दुनियाच आम्हाला जास्त प्रिय असं म्हणणारेही कमी नाहीत. बऱ्याचदा तर स्वप्न इतकी सुरेख असतात आणि वास्तव मात्र त्याच्या पूर्ण विरुद्ध असतं. अशा वेळी नेमका विश्वास कोणावर ठेवावा हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. हरकत नाही... हे अनेकांसोबतच घडतं. आज आपण इथे तुम्हाला काल किंवा कधी एकेकाळी पडलेल्या एका अशा स्वप्नाविषयी बोलणार आहोत ज्या स्वप्नाचा अर्थ तुम्हालाही आजपर्यंत कळला नसावा. (know the meaning of Women Related Dreams)

हेसुद्धा वाचा : Horoscope 2 December : या राशीच्या व्यक्तींनी आज बेजबाबदारपणा करणं टाळावं!

स्वप्नशास्त्रानुसार (swapnashastra) कधीही कोणतीही व्यक्ती एखादं स्वप्न पाहते तेव्हा त्या स्वप्नाचा एक अर्थ असतो. त्यातही स्त्री स्वप्नात येण्याचेही काही संकेत असतात. 

प्रत्येक वयाची स्त्री काहीतरी सांगू इच्छिते 

- तुमच्या स्वप्नात एखादी वृद्ध स्त्री (old woman) आली असल्यास याचा अर्थ येत्या काळात तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे. चहुबाजूंनी धनलाभाचे योग आहेत, अर्थार्जनाच्या वेगळ्या आणि नव्या वाटा तुम्हाला गवसणार आहेत. समाजात तुमच्याप्रती असणारी आदराची भावना वाढणार आहे. 

- स्वप्नात एखाद्या स्त्रीला संवाद साधताना तुम्ही पाहत असाल तर कुटुंबात तुमच्या शब्दाला प्रमाण मानलं जाणार आहे. 

- एखादी सुंदर तरुणी तुमच्या स्वप्नात आली, तर समजा तुमच्या आयुष्यात सुख- समृद्धी नांदेल. कुटुंबात असणारे वाद मिटतील. एखाद्या सुंदर आणि समजुतदार व्यक्तीच्या येण्याने तुमच्या कुटुंबाला आनंद मिळेल. 

- एखादी दागिन्यांनी मढलेली स्त्री तुम्ही स्वप्नात पाहिली, तर याचा अर्थ तुमची अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत. तुमच्या प्रत्येत कामात यश मिळणार आहे. चिंता करु नका. 

(वरील माहितीची झी 24 तास खातरजमा करत नाही. )