Ketu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद

Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरतोय. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात.

Updated: Jun 30, 2023, 10:53 PM IST
Ketu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद title=

Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरत असल्याने तिन्ही राशीच्या लोकांनी धन आणि समृद्धीसाठी तयार राहावे. ज्योतिष शास्त्रामध्ये केतू हा एक अशुभ ग्रह मानला जातो. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात. सध्या केतू तूळ राशीत असून ऑक्टोबरमध्ये कन्या राशीत प्रवेश करेल. 

ज्योतिष शास्त्रानुसार, केतुच्या वक्री चालीचा परिणाम काही राशींवर होणार आहेत. यामध्ये काहींना आरोग्याचे फायदे मिळणार आहेत, तर काहींना करियरबाबत चांगली बातमी मिळू शकणार आहे. 

कन्या रास

कन्या राशीतील केतूच्या वक्रीचा या राशीच्या राशीच्या लोकांना भरपूर यश मिळवून देणार आहे. या संक्रमणादरम्यान केतू जन्मपत्रिकेच्या पाचव्या घरात असेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचें आरोग्यही सुधारणार आहे. पैसे कमविण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. चांगली कामगिरी केल्याबद्दल तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या राशीच्या लोकांनाही केतूच्या संक्रमणामुळे खूप फायदा होणार आहे. या राशीच्या व्यक्ती जर आर्थिक संकटात अडकल्या असतील तर या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील. बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. पैसे वाचवण्याचे तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.

धनू रास 

केतूची वक्री चाल धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करू शकतात.  नोकरदारांनाही नवीन संधी मिळू शकतात. संपत्ती जमा करण्यात तुमची प्रगती होईल. प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याची अपेक्षा करू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )