Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ! हे नाथ नारायण वासुदेव हरी !!
प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण यांचं व्यक्तीमत्व अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता, प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचे नेता मानला जातो.
नारळी पौर्णिमा झाली की महिलांना वेध लागता ते गोकुळ अष्टमीचे. हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टीला विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानले जातात. गोकुळाष्टमी ही देशभरात विविध नावांना साजरी करण्यात येत आणि त्याचा प्रथा परंपराही वेगळ्या आहेत.
वैदिक पंचांगानुसार गोकुळ अष्टमी तिथी रविवार 25 ऑगस्ट 2024 ला मध्यरात्री 3.39 वाजेपासून सोमवारी 26 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 2.19 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट 2024 गौकुळ अष्टमी साजरी करण्यात येणार आहे. तर 27 तारखेला दहीदंडीचा उत्साह असणार आहे.
कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असणार आहे. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ असेल.
यंदा जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला असून योग दुपारी 3:55 वाजेपासून 27 ऑगस्टला पहाटे 5:57 पर्यंत असणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर, देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग अथवा पाटावर मांडावी. आता गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर, मुर्तीला दूध किंवा पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर, गोपी चंदनाचा टिळा मूर्तीला अथवा प्रतिमेला लावा. बाळकृष्णाचा साजऋंगार करा, फुलांच्या माळा अर्पण करा. मूर्तीसमोर तुपाचा दिवा किंवा निरांजन लावा. धूप-अगरबत्ती लावा. त्यानंतर, बाळगोपाळाची आरती करा आणि मनोभावे प्रार्थना करून साखर, मिठाई किंवा फळाचा नैवेद्य दाखवा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)