कामाचा व्याप कुटुंबापासून कसा ठेवाल दूर? या Tips पाहाच

काम आणि घर सांभाळताना येत आहेत अडचणी, ‘या’ काही Tips तुमच्यासाठी ठरू शकतील फायदेशीर  

Updated: Oct 26, 2022, 12:00 PM IST
कामाचा व्याप कुटुंबापासून कसा ठेवाल दूर? या Tips पाहाच title=

Personal & Professional life : खासगी आणि प्रोफेशन आयुष्यात कुटुंबाला (family time) वेळ देणं फार कठीण झालं आहे. विशेषतः महिला वर्गासाठी (work-life balance). आज अनेक महिला कामासाठी घराबाहेर पडतात. पण घराबाहेर पडल्यानंतर महिलांच्या फक्त ऑफिसला जाण्यासाठी प्रवास सुरू होत नाही, तर घरी आपलं मुल काय करत असेल? हा विचार कामय महिलांच्या मनात असतो. पण आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कामाचा व्याप कुटुंबापासून दूर ठेवता येईल.

या Tips पाहाच

  • जबाबदाऱ्या वाटून घ्या, जोडीदारसोबत काही जाबाबदाऱ्या वाटून घ्या. कारण एकत्र काम केल्यामुळे सर्व काही सोपं होतं. म्हणून म्हणतात, ‘team work is dream work’. काम आणि घरातल्या कामाच्या वेळेनुसार वेळापत्रत तयार करून घ्या. सकाळी तुम्हाला काम असले तर पती किंवा पार्टनरला मुलांची तयारी आणि काही कामे करायला सांगा. कारण तुमचा जोडीदार देखील पालक आहे.

 

  • मदत मागण्यासाठी लाजू नका. मदत मागण्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या मातृत्वाच्या जाबादारीपासून दूर जात आहात. कारण व्यक्तीला मदतची गरज भासते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराकडून, सासू-सासरे, आई-वडील, बहिण-भाऊ यांच्याकडून मदत मागण्यासाठी लाजू नका. त्यामुळे तुम्ही तुमचं खासगी आणि प्रोफेशन आयुष्य सांभाळू शकता.

 

  • दिवसभराच्या कामाचं वेळापत्रक तयार करा. वेळापत्रक तयार केल्यामुळे कोणतीही महत्त्वाची गोष्ट मागे राहणार नाही. तुम्ही वेळेत सगळी कामे करु शकता. त्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी देखील रोज थोडा वेळ मिळेल.

 

  • अनेकदा कामाच्या गोंधळात तुम्ही मुलांना जास्त वेळ कदाचित देवू शकत नसाल. (timetable for day to day life) पण स्वतःला यासाठी दोषी ठरवू नका. कारण तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक उत्तम दाखला आहात. एक आई तिच्या मुलांसाठी कायम उत्तम उदाहरण असते. (how to balance career and family )